लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे की नाही? अशाप्रकारे चेक करा

On: December 3, 2024 5:16 PM
Ladki Bahin Yojana List Online Check
---Advertisement---

Ladki Bahin Yojana List Online Check l महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा देखील झाले आहेत. अशातच आता डिसेंबर महिन्याचे पैेसे नेमके कधी जमा होणार याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.

अशातच आता या योजनेद्वारे राज्यातील गरीब महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत. ही योजना विशेषतः विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि अविवाहित महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. मात्र जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल, तर तुम्हाला देखील आर्थिक मदत मिळणार आहे. परंतु, तुमचं नाव अजुन देखील या लिस्टमध्ये आहे का हे चेक करणं अत्यंत गरजेचं आहे.

Ladki Bahin Yojana List Online Check l अशाप्रकारे चेक करा :

– लाडकी बहीण योजनेची लिस्ट चेक करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा mahaitgov.in या वेबसाइटवर जा. तिथे गेल्यावर तुम्हाला “लाभार्थी स्थिती” हा ऑप्शन निवडा.

– यानंतर एक नवीन पेज उघडेल. तिथे नोंदणी क्रमांक टाका, नंतर कॅप्चा पूर्ण करा आणि Send OTP वर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. या वेबसाइटवर ते टाका आणि Check ऑप्शनवर क्लिक करा.

– यानंतर आणखी एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्ही तुमच्या लाडकी बहिण योजनेचे status दिसेल. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्हाला योजनांची यादी पाहण्याचा ऑप्शन मिळेल.

– यानंतर योजनांची लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या शहरातील महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन “माझी लाडकी बहिण योजना यादी” या बटणावर क्लिक कराव लागणार आहे.

– यानंतर पुन्हा एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचा प्रभाग निवडावा लागेल. त्यानंतर “डाउनलोड” बटणावर क्लिक करा. डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही तुमचे नाव PDF मध्ये सहज तपासू शकता.

News Title – Ladki Bahin Yojana List Online Check

महत्त्वाच्या बातम्या-

नवीन मुख्यमंत्री कोण होणार? संजय शिरसाट यांनी दिली माहिती

लाडक्या बहिणींनो 2100 रुपये कधीपासून मिळणार?, मोठी अपडेट समोर

तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते? MPSC च्या पत्रिकेत अजब प्रश्न; पर्याय वाचून तुम्हीही विचारात पडालं

स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे होणारा नवरा?

अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now