Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींचा वर्षाचा शेवट हा गोड होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची महिलांना प्रतिक्षा लागली होती.अखेर या महिन्यातच त्याचे वितरण केले जाणार आहे. काल, 24 डिसेंबरपासूनच लाडक्या बहीणींना योजनेचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या चार दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असं म्हटलं होतं. हिवाळी अधिवेशन आता संपले आहे. त्यामुळे 1500 रुपयांची रक्कम आता लवकरच जमा केली जाईल.
येत्या 4 दिवसांत खात्यात पैसे जमा होणार
सरकारकडून डिसेंबरचा हप्ता हा दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना 1500 रुपये दिले जातील. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्याची पडताळणी करून आता त्या महिलांना डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल. (Ladki Bahin Yojana)
तर, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता अर्थसंकल्पानंतर मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 2 कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. सरकारकडून जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत, 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
आता पुढील काही दिवसात डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा होईल. विधानसभेच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय. त्यामुळे महिलांनी आपलं अकाऊंट चेक करत राहावं, असं आवाहन करण्यात आलंय. लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. (Ladki Bahin Yojana)
खात्यात पैसे आले की नाही कसं चेक कराल?
- तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेल्या रक्कमबाबत विचारणा करू शकता.
- तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून पैशाबाबत तपास करू शकता.
- बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल.
- तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही योजनेचे पैसे आले की नाही पाहू शकता.
News Title – Ladki Bahin Yojana installments will be deposited in 4 days
महत्त्वाच्या बातम्या-
दुःखद घटना! लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, ‘इतक्या’ जवानांचा जागीच मृत्यू
विनोद कांबळींच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे सरसावले, दिलं मोठं आश्वासन
देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव, मनातील इच्छा देखील होतील पूर्ण!
तुम्हाला प्रीमियरच्या संदर्भात पोलिसांची परवानगी नव्हती?; चौकशी दरम्यान अल्लू अर्जूनचा खुलासा
पुणे-नगर रस्ता नव्हे हा तर ‘मृत्यूचा महामार्ग’; वर्षभरात एवढ्या लोकांनी गमावले प्राण!






