लाडक्या बहीणींनो सरकारने थांबवला योजनेचा हप्ता; आता दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

On: October 19, 2024 11:09 AM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | महायुती सरकारच्या लाडक्या बहीण योजनेला राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. मात्र, आता योजनेचे हप्ते तूर्तास  थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)

महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता असल्याने तब्बल 10 लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून वंचित राहणार आहेत. सध्या योजनेचे हप्ते तूर्तास थांबवण्यात आले असले तरी 2 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच जमा झाला आहे.

ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यावर 3 हजार जमा करण्यात आले आहेत. मात्र, वेळेअभावी केवळ 10 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार नसल्याचं आता बोललं जातंय.

निवडणूक आचारसंहितेचा योजनेला फटका?

जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच, सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील एकत्रित जमा केले आहेत. आता थेट डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात येतील. मात्र, हे पैसे कधी येणार याबाबत तरी सध्या कोणतीच माहिती समोर आली नाही. (Ladki Bahin Yojana)

राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक लाभाच्या योजना ताबडतोब थांबवा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. या सुचनेनंतर महिला व बालकल्याण विभागाने ‘लाडकी बहीण’ योजनेचे वितरण चार दिवसांपूर्वी थांबवल्याची माहिती आयोगाला दिली आहे.

योजनादूतांची नियुक्ती देखील स्थगित

यासोबतच योजनादूतांची नियुक्ती करण्यास देखील माहिती व प्रसारण विभागाने स्थगिती दिली आहे. राज्य सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी दर महिन्याला 10 हजार रुपयांच्या मानधनावर योजनादूतांची नियुक्ती केली जाणार होती. पण, आता याला देखील स्थिगिती देण्यात आली आहे. कारण, निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत कोणत्याही शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी करता येत नाही. (Ladki Bahin Yojana)

News Title – Ladki Bahin Yojana installment stopped by Govt

महत्त्वाच्या बातम्या-

दिवाळीपूर्वीच सोनं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

शुक्र आणि शनीची युती ‘या’ 3 राशींना करणार धनवान, डिसेंबर महिना ठरणार भाग्याचा!

“सलमानने कधी साधं झुरळही मारलं नाही, तो माफी मागणार मागणार नाही”

आज शनीदेव कोणत्या राशींवर असणार मेहेरबान?, वाचा राशी भविष्य

आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर, भरपत्रकार परिषदेत घडलं असं काही की…

Join WhatsApp Group

Join Now