Ladki Bahin Yojana l राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली आहे. अशातच आता या योजने संदर्भात एक आनंदाची बातमी आहे.
महिलांना मिळणार गुड न्यूज :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकदाच जमा होणार आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा देखील केली आहे. त्यामुळे आता महिलांनी आपल्या बँक खात्याची KYC तसेच बँक खात्याला आधार क्रमांक लवकरात लवकर जोडून घ्यावा असे आवाहन देखील केले आहे.
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. नवरात्रोत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी हे मोठे सण आहेत. त्यामुळे राज्य सरकार या सणांचा विचार लक्षात घेऊन लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना ओकंबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच देणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यातील परळी येथे जाहीर सभेत म्हणाले आहेत.
Ladki Bahin Yojana l या तारखेला होणार पैसे जमा :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरर महिन्यांचे पैसे कधी जमा होणार यासंदर्भात देखील भाष्य केलं आहे. तर येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे 3000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच साधारण सहा ते सात दिवसांत महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर जमा होणार आहेत.
यापूर्वी देखील राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. मात्र या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
News Title – Ladki Bahin Yojana Fourth & Fifth Installment
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय! आता फक्त 99 रुपयांमध्ये मिळणार दारु
बाईक घ्यायचा विचार करताय? तर इंडियामध्ये ‘या’ आहेत टॉप-5 बाईक
मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार, भाजपला ठोकला रामराम
आता भारतीय रेल्वेचंही होणार खासगीकरण?, रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं






