Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा खात्यावर जमा करण्यात आला आहे. महायुती सरकारने रक्षाबंधन सणाच्या आधीच लाडक्या बहिणींना(Ladki Bahin Yojana) ही भेट दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
1 जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंत तब्बल 1 कोटी 35 लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधाच्या पार्श्वभूमीवर 17 ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार होता.
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा
मात्र, महायुती सरकारने त्यापूर्वीच हप्त्याचे पैसे जमा केले आहेत. यामुळे महिलांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वीच आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येलाच काही पात्र महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत.
महिलांना दोन महिन्याचे मिळून असे एकूण 3 हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे संदेश आले आहेत. सरकारने मुदतीपूर्वीच पैसे खात्यात वर्ग केल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण (Ladki Bahin Yojana) पाहायला मिळत आहे. महिला बँकेत जाऊन याबाबत अधिक चौकशी करू शकतात.
मोजक्याच बहीणींच्या खात्यात पैसे जमा, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, योजनेचे पैसे हे मोजक्याच महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. यावरूनही आता चर्चा रंगते आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद (Ladki Bahin Yojana) साधला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू *
मुंबई,दि.१४ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
राज्यात आतापर्यत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे.यातील जवळपास… pic.twitter.com/rTsrzqVVrM— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 14, 2024
“17 तारखेला पैसे ट्रान्स्फर करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत. 17 तारखेला तांत्रिक अडचणीमुळे खात्यात पैसे गेले नाही तर तुम्हीच बोंब माराल. त्यामुळे आम्ही आजच हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे.”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
News Title- ladki bahin yojana first installment news
महत्वाच्या बातम्या-
आज स्वातंत्र्यदिनाचा दिवस ‘या’ राशींसाठी भाग्याचा; मोठा धनलाभ होणार
राज्यात पावसाची विश्रांती; आता थेट ‘या’ तारखेनंतर वाढणार पावसाचा जोर
पुरुषांच्या ‘त्या’ समस्या दूर करेल लसूण; जाणून घ्या इतर फायदे
आम्ही हिंदू आहोत..’मी पुन्हा जन्म घेतला तर देवा मला मुलगा बनव’






