लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी केली महत्वाची घोषणा!

On: October 14, 2025 2:31 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना आता E-KYC (ई-केवायसी) प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी न केल्यास योजनेचा लाभ थांबवला जाईल. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. (Ladki Bahin Yojana)

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी विशेष सवलत :

ई-केवायसी करताना अनेक लाभार्थी महिलांना तांत्रिक अडचणी येत होत्या. यावर लक्ष देत सरकारकडून सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत आहे, तर पूरग्रस्त भागातील महिलांसाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात येणार असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

सरकारने ई-केवायसी प्रक्रियेत गती आणण्यासाठी विशेष सुधारणा केल्या आहेत. दररोज सुमारे 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पार पडत आहे. आतापर्यंत 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली असून, आणखी 2.5 लाख महिलांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana | ई-केवायसी का आवश्यक आहे? :

लाभार्थी प्रत्येक वर्षी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करावी लागणार आहे. सरकारने ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. (Ladki Bahin Yojana Update)

त्यामुळे महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाईटला भेट द्यावी.

News Title: Ladki Bahin Yojana E-KYC Update: Extended Deadline for Flood-Affected Women

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now