लाडक्या बहिणींना मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस; या 3 अटी लागू

On: October 15, 2024 1:49 PM
Ladki Bahin Yojana List Online Check
---Advertisement---

Ladki Bahin Yojana l राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून देतात. या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते देखील महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. अशातच आता या योजनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. महिलांना दिवाळीच्या निमित्ताने बोनस देखील दिला जाणार आहे.

राज्यातील महिलांना मिळणार दिवाळी बोनस :

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. मात्र, आता दिवाळी या सणानिमित्ताने राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचे देखील जाहीर केले आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये बोनसचे पैसे येणार आहेत.

अशातच राज्य सरकारने लाभार्थी महिलांना देखील दिवाळीच्या दिवसांत 3000 रुपयांचा बोनस जारी केला आहे. तर काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम देखील मिळणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार असल्याचं दिसत आहे.

Ladki Bahin Yojana l 5500 रुपये कोणाला मिळणार? :

दिवाळी या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गंत सर्व लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस राज्य सरकारने जारी केला आहे. तसेच या बोनसची रक्कम ही प्रतिमहिना मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. तसेच या व्यतिरिक्त 2500 रुपयांना अतिरिक्त रक्कम देखील महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यात 5500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.

मात्र या रकमेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असं गरजेचं आहे. तसेच या योजनेचा लाभ कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत घेतलेला असावा. याशिवाय महिलांचे अधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे. त्यामुळे या अटींची पूर्तता पूर्ण केलेल्या महिलांना तब्बल 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे.

News Title : Ladki Bahin Yojana Diwali Bonus

महत्वाच्या बातम्या-

आचारसंहिता म्हणजे काय? ‘या’ दरम्यान कोणत्या गोष्टींवर बंदी असते?

थोड्याच वेळात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार!

भाजपसह मनसेला मोठं खिंडार, माजी आमदारासह बड्या नेत्याचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश

विधानसभेपूर्वीच कॉँग्रेसला धक्का, ‘या’ विद्यमान आमदाराचा अजित पवार गटात प्रवेश

आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7 नेते होणार आमदार; विधीमंडळात आज शपथविधी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now