Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींसाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची महिलांना प्रतिक्षा लागली होती. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या महिन्यातच डिसेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana)
काही मीडिया रिपोर्टनुसार, आजपासूनच म्हणजेच 24 डिसेंबरपासूनच लाडक्या बहीणींना योजनेचे पैसे देण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणे या महिन्याचा हप्ता मिळणार आहे. योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात याआधीच जमा करण्यात आली आहे. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे महिलांना 7500 रुपये देण्यात आले आहेत.
आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. हिवाळी अधिवेशन आता संपले आहे. त्यामुळे 1500 रुपयांची रक्कम आता लवकरच जमा केली जाईल. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.
किती महिलांना मिळणार पैसे?
सरकारकडून डिसेंबरचा हप्ता हा दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना 1500 रुपये दिले जातील. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्याची पडताळणी करून आता त्या महिलांना डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल. (Ladki Bahin Yojana)
2100 रुपये कधीपासून मिळणार?
महायुती सरकार पुन्हा आले तर महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, असं महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. अशात राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले आहे. त्यामुळे महायुती सरकार दिलेला शब्द पाळणार का?, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगीतलं की, अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल.
म्हणजेच अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी चर्चा आहे. दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत 2 कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. सरकारकडून जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत, 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. (Ladki Bahin Yojana)
News Title – Ladki Bahin Yojana December installment will be available from today
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध गायकाच्या बिल्डिंगला भीषण आग, मोठी जीवितहानी…
‘मुलांना सांता नाही संत बनवा’, नितेश राणेंचं ट्वीट चर्चेत
“तुझाही संतोष देशमुख केला जाईल”; सत्ताधारी आमदाराच्या पुतण्यांना थेट धमकी
मुंडेंना पक्षातूनच मोठा धक्का, राष्ट्रवादीचा नेता अजित पवारांना म्हणाला ‘बंदोबस्त करून…’
इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा, आज ग्रहमान ‘या’ राशींना देणार साथ!






