Devendra Fadanvis | राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेविषयी (Ladki Bahin Yojana) मोठी अपडेट समोर आली आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी ही योजना राबवली जात असून दर महिन्याला महिलांच्या खात्यात ₹1,500 थेट जमा होतात. निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ही योजना अल्पावधीतच महिला वर्गात अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. मात्र, काही ठिकाणी अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाल्याने सरकारने त्यावर कारवाई सुरू केली आहे. अनेक महिलांना योजनेतून वगळलेही गेले आहे.
दरम्यान, या योजनेबाबत सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. लाभार्थींनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC पूर्ण करणं बंधनकारक आहे. अन्यथा, त्यांच्या खात्यात जमा होणारा निधी थांबवला जाण्याची शक्यता आहे. आधी KYC ची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती; मात्र सरकारने सर्वांना संधी मिळावी म्हणून मुदतवाढ दिली आहे. (KYC Update Ladki Bahin)
केवायसी अनिवार्य; अपात्र महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू :
शासनाच्या तपासात अनेक अपात्र महिला या योजनेचा फायदा घेत असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने त्यांना वगळण्याची प्रक्रिया हाती घेतली. पात्र महिलांपर्यंतच योजना पोहोचावी यासाठी KYC अनिवार्य करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातही मोठ्या प्रमाणात केवायसी प्रक्रिया सुरू आहे. योजनेचा लाभ अखंडित मिळावा यासाठी महिलांनी आधार, बँक तपशील आणि अन्य आवश्यक कागदपत्रांसह त्वरीत KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
ही योजना सुरू करताना सरकारने काही पात्रता निकष जाहीर केले होते. मात्र, अनेक ठिकाणी या निकषांचे पालन न होता लाभ घेणाऱ्या महिला आढळल्या. त्यामुळे प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांपर्यंतच निधी पोहोचवण्यावर सरकारचा भर वाढला आहे. जिल्हा प्रशासनांनाही केवायसी मोहिमेला गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Devendra Fadanvis | विरोधकांवर फडणवीसांचा हल्ला; “लाडकी बहिणी आता लखपती दीदी बनणार”
या योजनेबाबत विरोधकांकडून वारंवार आरोप करण्यात येत होते की लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार आहे. यावर वाशिममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत मोठी घोषणा केली.
“विरोधक म्हणत होते की लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होईल. मात्र जोपर्यंत ‘देवा भाऊ’ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना सुरुच राहणार.” — असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
याचबरोबर त्यांनी आणखी एक बंपर घोषणा करताना म्हटले, “लाडक्या बहिणी आता फक्त लाडक्या बहिणी राहणार नाहीत, त्या ‘लखपती दीदी’ बनणार आहेत. आम्ही आतापर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार केल्या आहेत. अजून 50 लाख लखपती दीदी तयार करायच्या आहेत.” (Lakhpati Didi Scheme)
मुख्यमंत्री फडणवीसांच्या या घोषणेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण असून, योजनेंतर्गत अधिक सशक्त आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.






