लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, योजनेसाठी अर्ज करण्यास मिळणार मुदतवाढ?

On: September 27, 2024 8:35 AM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजने अंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जात आहेत. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून महिलांसाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करता येणार होते. आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ladki Bahin Yojana)

योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळणार?

योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी 24 सप्टेंबरपर्यंतची आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. पाहायला गेलं तर सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाहीये.

राज्य सरकारने जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली. या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पहिली अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. त्यानंतर मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.(Ladki Bahin Yojana)

योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार?

लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांना सरकारकडून देण्यात आले आहेत. लवकरच आता तिसरा हप्ता देखील दिला जाणार आहे. 29 सप्टेंबरपर्यंत महिलांना योजनेचा तिसरा हप्ता मिळणार आहे. तसेच, ज्यांना योजनेचे अद्याप एक रुपयाही मिळाला नाही, त्यांना थेट 4500 रुपये मिळतील. (Ladki Bahin Yojana)

News Title –  Ladki Bahin Yojana application deadline  

महत्वाच्या बातम्या- 

आज शिवयोगात ‘या’ राशींचं भाग्य फळफळणार, सर्व गोष्टीत यश मिळणार!

मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण? तर राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक कोण?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना सर्वात मोठा दिलासा!

लाडक्या बहिणींनो तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार!

Join WhatsApp Group

Join Now