1 सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या बहीणींना किती लाभ मिळणार?, 4500 की फक्त1500?

On: September 3, 2024 10:04 AM
Ladki Bahin Yojana List Online Check
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | राज्यभरात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचाच बोलबाला आहे. महायुती सरकारने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बहीणींच्या खात्यावर योजनेचे पैसे पाठवून त्यांना मोठी भेट दिली. या योजनेसाठी आतापर्यंत लाखो अर्ज करण्यात आले आहेत. अनेक बहीणींना योजनेचे पैसे देखील मिळाले आहेत. महिलांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मुदतवाढ दिली आहे. (Ladki Bahin Yojana )

लाडकी बहीण योजनेंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. अशात, ज्यांनी अद्याप अर्ज भरला नाही किंवा ज्या महिला अपात्र आहेत, त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

सप्टेंबरपासून फक्त 1500 रुपयेच मिळणार

योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील. लाडकी बहीण योजनेत नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. पण, आता त्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana )

त्यामुळे आता ज्या महिन्यात बहिणी योजनेसाठी नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. बहिणींना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

4500 रुपये आता कुणाला मिळणार?

महायुती सरकारने महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 3 हजार रुपये म्हणजेच योजनेचे दोन हप्ते जमा केले आहेत.त्यातच जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जांची पडताळणी होणे बाकी आहे. (Ladki Bahin Yojana )

आता ज्या महिलांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे, अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळतील. मात्र सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळेल मिळणार आहे. म्हणजेच फक्त 1500 रुपये मिळतील.

News Title : Ladki Bahin Yojana applicant will get only 1500 rupees from September

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! हवाई दलाचं मिग 29 विमान कोसळून मोठा स्फोट; पाहा Video

‘या’ राशीच्या लोकांच्या दारी येईल लक्ष्मी, मिळेल पैसाच पैसा!

प्रिया बापटचे बोल्ड सीन्स, रितेश देशमुखचा नवा अंदाज… टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या

… म्हणून अंगाला काय भोकं पडत नाहीत; अजितदादा सुप्रियाताईंना असं का म्हणाले?

खुशखबर! iPhone झाला स्वस्त; मिळतेय 19 हजारांची सूट

Join WhatsApp Group

Join Now