Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Ladki Bahin Yojana) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹1,500 सन्मान निधी जमा केला जातो. मात्र ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थींना वेळेत मिळाले नसल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. शेवटी, महिलांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केलं की, ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला आहे.
काय म्हटलं आदिती तटकरे यांनी? :
आदिती तटकरे यांनी ट्विट करत लिहिलं – “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे.”
या घोषणेमुळे गेल्या महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना दिलासा मिळणार आहे. लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा निधी जमा होईल. (Ladki Bahin Yojana)
Ladki Bahin Yojana | कोणत्या महिलांना मिळतो योजनेचा लाभ? :
‘लाडकी बहीण’ योजना सुरू करताना काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या होत्या.
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
वयाची मर्यादा – 65 वर्षांपर्यंतच्या महिलाच पात्र ठरतील.
एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा फायदा मिळू शकतो.
या अटींचा भंग करून काही ठिकाणी महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे अशा अपात्र लाभार्थ्यांची नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठं पाऊल :
या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार मिळत आहे. दर महिन्याला मिळणारा ₹1,500 चा सन्मान निधी त्यांच्या दैनंदिन खर्चाला हातभार लावत आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरते. त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि सामाजिक स्थैर्याला मोठा हातभार लागणार आहे.






