Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Ladki Bahin Yojana) अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा ₹1500 चा सन्मान निधी जमा होऊ लागला आहे. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी ट्विट करून माहिती दिली की, “आजपासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा निधी जमा होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीपणे पुढे जात आहे.”
344.30 कोटींचा निधी वर्ग :
सामाजिक न्याय विभागानं ऑगस्ट महिन्याच्या लाभासाठी ₹344.30 कोटींचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. 9 सप्टेंबर रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे.
‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) जुलै 2024 मध्ये महायुती सरकारनं सुरू केली होती. या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 13 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता 14 व्या हप्त्याचे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Ladki Bahin Yojana | महिलांसाठी दिलासा :
योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) पद्धतीने महिलांच्या आधार-लिंक बँक खात्यात निधी जमा केला जातो. त्यामुळे पारदर्शकता टिकून राहते आणि लाभार्थींना थेट मदत मिळते. ऑगस्ट महिन्याचा निधी वेळेत न मिळाल्याने अनेक महिलांना संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता प्रत्यक्ष वितरण सुरू झाल्याने त्यांची प्रतीक्षा संपली आहे. (Ladki Bahin Yojana August Installment)
‘माझी लाडकी बहीण’ ही योजना महायुती सरकारसाठी राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना ग्रामीण व शहरी भागात लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे सरकारनं ती पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.






