Ladki Bahin Yojana | दिवाळी अगदी जवळ आली असून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी बहिणी आपल्या पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी 13 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र खात्यांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आज अनेकांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे.
आता प्रश्न असा निर्माण होतो की, “माझ्या खात्यात 1500 रुपये आले की नाही हे कसं तपासायचं?” हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया पैसे तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि योजनेतील नव्या अटी.
सरकारकडून मिळणारी मदत आणि ई-केवायसीचे महत्त्व :
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देते. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते वितरित झाले असून आता 15 वा हप्ता जमा होणार आहे. अनेक खात्यांमध्ये आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. (Ladki Bahin Yojana September Installment)
योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. जर लाभार्थी विवाहित असेल, तर तिला पतीच्या पॅन कार्डवरून ई-केवायसी करावी लागेल. अविवाहित मुलींसाठी वडिलांचे पॅन कार्ड आवश्यक आहे. जर केवायसी पूर्ण नसेल, तर पुढचा हप्ता थांबण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana | 1500 रुपये आले की नाही, कसे तपासायचे? :
– सर्वात प्रथम ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
– त्यानंतर तुमचं ई-केवायसी स्टेटस तपासा. जर पूर्ण नसेल, तर त्वरित करून घ्या.
– त्यानंतर नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा ATM वरून तुमचे खाते स्टेटमेंट पहा. तेथे “CM LADKI BAHIN YOJANA” असा व्यवहार दिसेल.
– जर बँककडून एसएमएस अलर्ट सुरू असतील, तर पैसे जमा होताच तुमच्या मोबाइलवर मेसेज येईल.
– ऑनलाइन माहिती मिळाली नाही तर आपल्या तालुका महिला व बालविकास कार्यालयात संपर्क साधा. तेथे तुमचा अर्ज क्रमांक आणि खाते तपशील देऊन पुष्टी मिळवता येईल.






