लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी!

On: August 18, 2024 12:29 PM
Ladki Bahini Yojana
---Advertisement---

Ladaki Baheen Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. योजनेसाठी राज्यातील दीड कोटींपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांच्यांपैकी अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत.

लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास 14 ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. 17 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलंय. माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladaki Baheen Yojana) लाभ राज्यातील 21 ते 65 या वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना मिळणार आहे.

शासनाकडून गाईडलाईन जारी

अजूनही ही प्रक्रिया सुरु आहे. काही महिलांच्या खात्यांत येत्या काही दिवसांत पैसे जमा होणार आहे. काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही. त्यांनी नेमकं काय करावं, यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत.

तुम्ही लाडकी बहीण (Ladaki Baheen Yojana) अ‍ॅप किंवा नारीशक्ती पोर्टलवरुन अर्ज केला आहे. तो मंजूर झाला आहे. परंतु पैसे बँक खात्यात आले नाही. तर आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही? हे तपासून पाहा. बँक खाते आधारकार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा. त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील.

पैसे आले नाही, मग असं करा

तुमच्या मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे. त्यानंतर त्या त्रुटीची पुर्तता करुन अर्ज पुन्हा सबमिट करावा. आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहा.

बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये. कोणत्याही बँकेते 500 किंवा हजार रुपयांसोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खातं उघडता येतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुण्यात राबवली लाडके दाजी योजना, हॉटेलच्या बिलावर मिळतेय 1500 रु. सूट

गुजरात टायटन्सच्या हेड कोचची धुरा ‘हा’ खेळाडू सांभाळणार; जाणून घ्या त्यामागची 3 मोठी कारणे

सुप्रियाताईंना देखील लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळणार?

‘अशा’ व्यक्तींनी चुकूनही सफरचंद खाऊ नये; अन्यथा होतील गंभीर परिणाम

“फडणवीसांच्या घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ”; संजय राऊतांची भविष्यवाणी

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now