कुर्ला अपघातातील चालकाबाबत धक्कादायक खुलासा समोर!

On: December 10, 2024 11:21 AM
Kurla Bus Accident driver Big update
---Advertisement---

Kurla Bus Accident | मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या ‘बेस्ट’ बसच्या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. काल रात्री झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर, 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल 60 प्रवासी होते. या प्रकरणी, पोलिसांनी बस चालकाला अटक केली असून चालकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Kurla Bus Accident)

बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे. घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमकडून पंचनामा देखील करण्यात आला आहे. दरम्यान,चालकाबाबत पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चालकाला अनुभवच नाही?

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील चालक संजय मोरे हा 1 डिसेंबर रोजी चालक म्हणून रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. चालकाचे वय 54 वर्ष असून तो यापूर्वी अन्य ठिकाणी कामाला होता. बस चालकाने यापूर्वी कोणतेही वाहन चालवले नसल्याचं देखील समोर आलंय. या प्रकरणी चालकावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. (Kurla Bus Accident)

या अपघातात जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालय आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज देखील व्हायरल झाले आहे. त्यात स्टॉपवर काही नागरिक दिसून येत आहेत. अशात अचानकच एक बस रिक्षाला धडक देऊन तिला फरफटत नेताना दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

332 नंबरची बेस्टची बस ही कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती. ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना हा अपघात झाला. कुर्ल्यात आल्यानंतर बेस्ट बसचं नियंत्रण सुटलं आणि हा भयंकर अपघात घडला, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप अपघाताचं कारण पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. (Kurla Bus Accident )

या भरधाव वेगातील बसने 30 ते 40 वाहनांना देखील धडक दिली. काही वाहने अगदी 100 मीटरपर्यंत फरफटत नेली. बस इतकी वेगात होती की तिने धडक दिलेल्या गाड्या रस्त्याच्या बाजूला बांधकाम सुरु असलेल्या पिलरवर आदळून अगदी चक्काचूर झाल्या. रात्री पाऊणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहेत.

News Title –  Kurla Bus Accident driver Big update

महत्वाच्या बातम्या- 

ब्रेक फेल की… कुर्ल्यातील अपघातामागचं खरं कारण काय?

राजकीय वर्तुळात शोक, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं निधन

“लाडक्या तायांनो, आता रस्त्यावर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून स्वतःचं रक्षण…”; किरण माने यांची पोस्ट

महायुतीत कुणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?, संभाव्य यादी समोर

मुंबई हादरली! कुर्ल्यात मृत्यूतांडव, भरधाव बेस्टने समोर दिसेल त्याला चिरडलं, नेमकं काय घडलं?

Join WhatsApp Group

Join Now