आज कृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

On: August 26, 2024 10:19 AM
krishna janmashtami 2024
---Advertisement---

krishna janmashtami 2024 | आज संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यंदा जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी होत असून पूजेसाठी शुभ मुहूर्त किती वेळ असणार, पूजेची विधी काय असणार? याबाबत या लेखात सर्व माहिती दिली आहे. (krishna janmashtami 2024)

पौराणिक कथेनुसार, द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक व्रत करतात आणि रात्री श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात.

आज श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी म्हणजेच कृष्णाष्टमी आहे. कृष्ण जन्माष्टमीला श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. कृष्ण अष्टमी तिथी आज पहाटे 3 वाजून 39 मिनिटांनी सुरू झाली असून ती उद्या 27 ऑगस्ट पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी संपेल.

जन्माष्टमी 2024 शुभ मुहूर्त-

कृष्ण जन्माष्टमीसाठी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12.45 पर्यंत असेल. यंदा कृष्णाची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. तुम्हाला 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल. (krishna janmashtami 2024)

जन्माष्टमी पूजा मंत्र-

श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी तुम्ही दोन मंत्र वापरू शकता.

1. ओम नमो भगवते वासुदेवाय ।
2. ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः।

जन्माष्टमी सर्वार्थ सिद्धी योगात साजरी होणार-

यंदा जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. जन्माष्टमी दिवशी सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 3:55 पासून सुरू होईल आणि 27 ऑगस्टला पहाटे 5:57 पर्यंत चालेल. आजच्या दिवशी मथुरा, वृंदावन येथे मोठे उत्सव होतात. संपूर्ण जगभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (krishna janmashtami 2024)

News Title –  krishna janmashtami 2024

महत्त्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो सतर्क राहा! आज अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला! नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या डोक्याला ताप, महायुतीच्या 2 आजी-माजी आमदारांमध्ये कलह

युवकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सिनेमातून भाष्य, श्रीयुत नॅान महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या भेटीला

आज गोकुळाष्टमी! कृष्णाच्या कृपेने ‘या’ 5 राशीचं नशीब उजळणार

Join WhatsApp Group

Join Now