Sharad Pawar Group | विधानसभा निवडणुका आता लवकरच होणार आहेत. राज्यभरात सध्या या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात व्यस्त आहे. दोन्ही आघाडीमध्ये जागावाटप संदर्भात चर्चा देखील सुरू आहे. अशात भाजप आणि अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. गेल्या काही दिवसांत भाजपमधील अनेक नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. अजित पवार गटातही हीच स्थिती आहे. तर, काहींनी पुन्हा घरवापसी करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का दिला आहे. (Sharad Pawar Group)
आता भाजपला आणखी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्हयातील भाजपचा मोठा नेता शरद पवार यांच्या गळाला लागला असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे चंदगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूरमधील बडा नेता भाजपला देणार धक्का?
भाजप नेते शिवाजीराव पाटील भाजपला धक्का देत शरद पवार गटात जाणार, अशा आता चर्चा होऊ लागल्या आहेत. शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी कागलमधील समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. आता चंदगडमधून शिवाजीराव पाटील देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. (Sharad Pawar Group)
शिवाजीराव पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. अशात निवडणूक तोंडावर असताना त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाची चर्चा आहे. असं झाल्यास, भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जाईल.कोल्हापुरमध्ये यापूर्वी समरजीत घाटगे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.अशात आणखी एक बडा नेता पक्ष सोडणार म्हटल्यावर भाजप कार्यकर्ते देखील चिंतेत आहेत.
अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला
दुसरीकडे अजित पवार यांना देखील धक्का देणारी माहिती समोर आली आहे. अजित पवार समर्थक असलेले माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे हे आज शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. बबनदादा शिंदे आणि विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, दोघेही शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.कालच राजन पाटील यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली होती. (Sharad Pawar Group)
News Title- Kolhapur big BJP leader may join Sharad Pawar Group
महत्त्वाच्या बातम्या-
यंदाच्या शारदीय नवरात्रीसाठी ‘हे’ आहेत 9 रंग; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
टीम इंडियात पडली फूट? हार्दिक आणि शमीच्या ‘त्या’ धक्कादायक व्हिडीओमुळे चाहते टेन्शनमध्ये
खतरों के खिलाडीच्या विजेत्याला ट्रॉफीसह मिळालं बरचं काही? बक्षिसाची यादी पाहून व्हाल थक्क!
आज कर्कसह ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, उत्पन्न होणार डबल!
..आता याला काय म्हणावं?, मुंबईत शाळकरी मुलीने रचला स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव






