Kojagiri Purnima horoscope | अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. यंदा आज म्हणजेच 16 ऑक्टोबररोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. आजपासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत.ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. 17 ऑक्टोबरला ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. (Kojagiri Purnima horoscope)
तसेच, 20 ऑक्टोबरला मंगळ देखील कर्क राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब उजळेल. त्यामुळे यंदाची कोजागिरी 3 राशींसाठी शुभ आणि भाग्याची ठरणार आहे. ग्रहाच्या संक्रमणामुळे 16 ऑक्टोबरपासून तीन राशींचे सुखाचे दिवस येणार आहेत. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात.
कोजागिरी पौर्णिमेला दुर्मिळ योग तयार होणार
समसप्तक योग
ध्रुव योग
महालक्ष्मी योग
वृद्धी योग
बुधादित्य राजयोग (Kojagiri Purnima horoscope)
‘या’ राशींचं नशीब उजळणार
मेष रास : यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा मेष राशीसाठी अत्यंत खास ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अनेक संधी मिळतील. या लोकांना देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचं एखादं काम पैशामुळे अडलं असेल तर ते पूर्ण होईल. तसेच, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सर्व काही सामान्य असेल, ज्यामुळे तुम्ही इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकाल.
कन्या रास : कन्या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन योजना देखील राबवाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. नोकरदारांसाठी कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. तुमचे विवाह स्थळ जुळून येण्यामधील ज्या अडचणी असतील, त्या दूर होतील. (Kojagiri Purnima horoscope)
कुंभ रास : कुंभ राशीच्या लोकांसाठी शरद पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांवर देवी नारायणीची कृपा असेल. तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचं प्रकरण पुढे जाऊ शकतं, यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांना या काळात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
News Title : Kojagiri Purnima horoscope
महत्वाच्या बातम्या-
आज कोजागिरी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी!
आज कोजागिरी पौर्णिमा, 12 पैकी ‘या’ राशींना होणार धनलाभ!
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी आयोगाचा महत्त्वाचा निर्णय!






