Kojagiri Purnima 2024 | अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला मोठे महत्व असते. कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने मोठा दिसतो. यंदा आज म्हणजेच 16 ऑक्टोबररोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. आज शुभ मुहूर्त कोणता, तसेच पूजा विधी कशी असणार याबाबत जाणून घेऊयात. (Kojagiri Purnima 2024 )
कोजागिरी पौर्णिमा आज की उद्या?
पंचांगानुसार, या वर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबरला, म्हणजेच आज रात्री 8.40 वाजता सुरु होणार आहे. ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.56 मिनिटांपर्यंत असणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत
पौर्णिमा तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. तसेच, मंदिराचा देव्हारा स्वच्छ करा. त्यानंतर लाल कपडा पसरवून त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो लावा. त्यानंतर देवीची पूजा करा. चंद्रोदयानंतर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर दूध किंवा खीरचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून द्या. (Kojagiri Purnima 2024 )
पूजेसाठी लागणारे साहित्य-
कोजागिरी पौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये कलश, तेल, 5 प्रकारची फळे, फूल, तूप, 11 दिवे, पानं, धूप, सुपारी, चंदन, अक्षतासह अन्य साहित्य एकत्र करा. (Kojagiri Purnima 2024 )
कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात?
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतसारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे आजच्या दिवशी दूध किंवा खीर बनवून त्याचे सेवन केले जाते.(Kojagiri Purnima 2024 )
News Title : Kojagiri Purnima 2024
महत्वाच्या बातम्या-
आज कोजागिरी पौर्णिमा, 12 पैकी ‘या’ राशींना होणार धनलाभ!
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी आयोगाचा महत्त्वाचा निर्णय!
जबरदस्त फीचर्ससह टोयाटो कंपनीची कार लाँच!






