Farmer Scheme | भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आजही बचतीसाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांवर जास्त विश्वास ठेवतात. सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा हे दोन प्रमुख घटक असल्याने या योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यापैकीच सर्वाधिक लक्षवेधून घेणारी योजना म्हणजे किसान विकास पत्र (KVP), जी विशेषतः शेतकरी, नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी लाभदायक मानली जाते. (Kisan VIkas Patra Yojana)
थोड्या गुंतवणुकीत दुप्पट परतावा :
किसान विकास पत्र योजनेचे (Kisan VIkas Patra Yojana) सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची सुरुवात फक्त १,००० रुपयांपासून करता येते. या योजनेत गुंतवणुक करण्यासाठी जास्त रकमेची मर्यादा नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कितीही रक्कम गुंतवू शकते. गरीब शेतकरी असो किंवा बचत वाढवण्यासाठी इच्छुक असणारा सामान्य नागरिक प्रत्येकासाठी ही योजना दीर्घकालीन नफा देणारी गुंतवणूक ठरते.
योजनेतील दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चक्रवाढ व्याजाचा लाभ. सध्या या योजनेवर ७.५ टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे. उदाहरणार्थ, जर कोणी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर पहिल्या वर्षी ७,५०० रुपये व्याज मिळते. हे व्याज मूळ रकमेत जोडले जाते आणि पुढील वर्षी वाढलेल्या रकमेसोबत पुन्हा व्याज मिळते. अशा प्रकारे साधारणपणे ९ वर्षे ६ महिन्यांत म्हणजेच ९.५ वर्षांत गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.
Farmer Scheme | योजनेचा लाभ कसा घ्यावा :
किसान विकास पत्र योजनेत खाते उघडणे अत्यंत सोपे आहे. कोणतीही व्यक्ती स्वतंत्रपणे खाते उघडू शकते. तसेच इच्छेनुसार अनेक खाती उघडण्याची मुभा आहे. एवढेच नव्हे, तर १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावानेही खाते उघडता येते. ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होतो.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिची सरकारी हमी. किसान विकास पत्र ही भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी योजना असून केंद्र सरकारकडून पूर्ण संरक्षण मिळते. त्यामुळे यात गुंतवलेले भांडवल बुडण्याचा धोका नाही. सुरक्षितता आणि हमी परताव्यामुळे ही योजना ग्रामीण शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर शहरी गुंतवणूकदारांसाठीही एक विश्वासार्ह पर्याय ठरते. (Kisan VIkas Patra Yojana)
एकंदरीत, किसान विकास पत्र योजना ही शेतकरी आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी सुरक्षिततेसह खात्रीशीर नफा देणारी योजना आहे. कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करून दीर्घकालीन कालावधीत ती दुप्पट होते, हे या योजनेचे प्रमुख आकर्षण आहे. सरकारी हमीसह असलेली ही योजना आजच्या काळात जोखीममुक्त आणि स्थिर परतावा देणारा एक उत्तम पर्याय ठरते.






