Kiran Mane | बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी रोज नवीन-नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्यामुळेही नवीन वाद निर्माण झाला आहे. प्राजक्ताने देखील धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. आपपासांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, असं म्हणत प्राजक्ताने धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. (Kiran Mane )
याच प्रकरणी आता अभिनेते किरण माने यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुकवर यासंबंधी एक पोस्ट केली असून ही पोस्ट आता तूफान व्हायरल झाली आहे. किरण माने यांनी प्राजक्ताबाबतचं विधान निंदनीय असल्याचं म्हणत मराठी कलाकारांचीही कानउघडणी केली.
किरण माने यांची पोस्ट काय?
‘प्राजक्ताबाबतचे विधान निंदनीयच आहे, त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटोज व्हायरल झाले होते, कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या, मणिपूरला भगिनींची विटंबना झाली, तेव्हा जे महाभाग मुग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानक-भयानक ‘समस्त महिलावर्गाविषयी’ पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे,’ अशी पोस्ट किरण माने(Kiran Mane ) यांनी केली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी #सुमारांचा_थयथयाट असा हॅशटॅगसुद्धा वापरला आहे. किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ‘बीड, परभणी प्रकरणावर गप्प बसणारे आता समोर आले आहेत’, असं एक नेटकरी म्हणाला. तर, ‘हे मात्र बरोबर आहे दादा’, असं अन्य एका नेटकऱ्याने लिहिलंय.
Prajakta Mali vs Suresh Dhas
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांवर काही आरोप करण्यात येत आहेत. तसेच बीड मधील सर्वपक्षीय आमदारांनी या प्रकरणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना टार्गेट केलं आहे. आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अनेक अभिनेत्रींचा उल्लेख केला होता. यात त्यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे देखील नाव घेतले होते.
धनंजय मुंडे यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर सुरेश धस बोलत होते. यावेळी त्यांनी काही अभिनेत्रींचा उल्लेख केला होता. “मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वीटभट्ट्या, जमिनी बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला. या पैशांतून इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना परळीत आणले जाते. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे”, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणीच आता किरण माने (Kiran Mane ) यांची देखील पोस्ट चर्चेत आलीये.
News Title : Kiran mane post on Prajakta Mali-Suresh Dhas dispute
महत्त्वाच्या बातम्या-
सिनेसृष्टीत खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
सर्वात मोठी बातमी! वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर सरेंडर होणार?
ठाकरे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
आज सोमवती अमावस्या, भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!
संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण, राष्ट्रवादीची युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेचं काय कनेक्शन?






