“लाडक्या तायांनो, आता रस्त्यावर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून स्वतःचं रक्षण…”; किरण माने यांची पोस्ट

On: December 10, 2024 9:34 AM
Kiran Mane post on ladki bahin yojana
---Advertisement---

Kiran Mane | मराठी अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने नेहमीच विविध विषयांवर थेट भाष्य करत असतात. राजकीय विषयांवर देखील ते आपली भूमिका मांडत असतात. अशात त्यांनी लाडकी बहीण योजेनवरून महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत. किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर पोस्ट करत या योजनेवरून संताप व्यक्त केला आहे. त्यांची ही पोस्ट आता तूफान व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांच्या देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

किरण माने यांनी आता ‘लाडकी बहीण योजनेवर’ प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी कुणाचेही नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. त्यांनी या पोस्टद्वारे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टार्गेट केलं आहे.

किरण माने यांची पोस्ट-

“बहिणींनी दरमहा दिलेला खाऊ आणि “पैशे आले का?” हे विचारणारा भाऊ, दोन्हीही गुंडाळून डस्टबीनमध्ये फेकून दिले आहेत! काम झाले, विषय संपला. लाडक्या तायांनो, आता रस्त्यारस्त्यावर समोर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून तुम्ही स्वत:च स्वत:चं रक्षण करा.”, अशी पोस्ट किरण माने (Kiran Mane) यांनी केली आहे.”

किरण माने यांच्या पोस्टवर नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. ‘एकदम बरोबर दादा…’,असं एक नेटकरी म्हणाला.तर, ‘ते होणारच होतं फक्त निवडणूक होण्याची वाट बघत होते..’, असं दूसरा एक नेटकरी म्हणाला. ‘किरणजी परखड सत्य मांडलं आहे…’, असं एक नेटकरी म्हणाला. त्यामुळे सध्या किरण माने यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

दरम्यान, किरण माने यांनी पोस्ट मध्ये उल्लेख केलेली दोन्ही नावे काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू असलेले प्रज्वल रेवन्ना यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांच्यावर आतापर्यंत लैंगिक छळाचे 3 गुन्हे दाखल आहेत. तर, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात भारतातील कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे देशभरातील कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. याच दोन्ही नावांचा उल्लेख किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय.

News Title : Kiran Mane post on ladki bahin yojana

महत्त्वाच्या बातम्या-

महायुतीत कुणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?, संभाव्य यादी समोर

मुंबई हादरली! कुर्ल्यात मृत्यूतांडव, भरधाव बेस्टने समोर दिसेल त्याला चिरडलं, नेमकं काय घडलं?

आज वृषभसह ‘या’ राशींना मिळणार शुभवार्ता, धनलाभाचेही संकेत!

खळबळजनक! पुण्यात भाजप आमदाराच्या मामाचं भर चौकातून अपहरण

प्रियांका गांधींनी राजीनामा द्यावा; भाजप नेत्यानी केली मागणी

Join WhatsApp Group

Join Now