संतोष देशमुखांची हत्या ‘इतक्या’ कोटींसाठी केली, सुरेश धसांचा हल्लाबोल

On: January 11, 2025 4:51 PM
Santosh Deshmukh
---Advertisement---

Santosh Deshmukh l बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावचे सरपंच यांची 9 डिसेंबरला निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र या हत्या प्रकरणातील 7 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र या घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले? :

आमदार सुरेश धस म्हणाले की, “आज संतोष देशमुख हत्याप्रकरणात 7 आरोपींवर मोक्का लागला आहे. मात्र राहिलेल्या आठव्या व्यक्तीवर देखील मोक्का लागला पाहिजे. तसेच त्याच्यावर 302 कलाम देखील झाला पाहिजे. तसेच यामध्ये सुद्धा आका आहे. तसेच तोच मेन असल्याचा हल्लाबोल आमदार सुरेश धस यांनी केला आहे”.

याशिवाय “19 ऑक्टोबरला वरच्या आकाने स्वत: सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली होती. मग तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच संतोष देशमुखांची हत्या दीड़ कोटीसाठी केली आहे, परंतु वाल्याकाका दीड नाहीतर संतोष देशमुखसाठी आम्ही 3 कोटी गोळा करुन दिले असते असे देखील आमदार सुरेश धस म्हणाले आहेत”.

Santosh Deshmukh l देशमुख व सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा :

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज धाराशीवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. बार्शी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.

यावेळी संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आमदार सुरेश धस बोलत होते.

News Title : Killed Santosh Deshmukh for 1.50 crores

महत्त्वाच्या बातम्या-

“…तरच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवरील मोक्का टिकेल”, वकील नेमकं काय म्हणाले?

केस कापायला आता मोजावे लागणार इतके पैसे, सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका!

बस अचानक सुरु झाली अन् पुढं घडलं भयंकर!

बीडमध्ये एका महिन्यात घडल्या मोठ्या घडामोडी? जाणून घ्या संपूर्ण घटना एका क्लिकवर

प्रसिद्ध अभिनेत्याला आला हार्टअटॅक, बातमीने सिनेसृष्टीत उडाली खळबळ

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now