अवघ्या 10 रुपयांत करा घरातील झुरळांचा नायनाट! जाणून घ्या सोपी पद्धत

On: October 7, 2025 3:24 PM
Kill Cockroach
---Advertisement---

Kill Cockroach | दिवाळी जवळ येत आहे आणि घराघरात साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. अशा वेळी बहुतेकांच्या डोक्याला ताप ठरतो तो म्हणजे घरात वाढलेली झुरळांची समस्या. महागडे स्प्रे, कीटकनाशके वापरूनही ही झुरळं पूर्णपणे नष्ट होत नाहीत. मात्र आता फक्त 10 रुपयांत घरच्या घरी झुरळं संपवण्याचा एक सोपा उपाय समोर आला आहे.

या उपायामुळे झुरळं केवळ पळूनच जात नाहीत तर त्यांचा पुन्हा त्रासही होत नाही. सर्वात खास बाब म्हणजे या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू घरात सहज उपलब्ध असतात आणि या मिश्रणामुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. (Kill Cockroach)

झुरळं पळवण्यासाठीचं औषध तयार करण्याची सोपी पद्धत :

या घरगुती उपायासाठी लागणाऱ्या वस्तू अगदी साध्या आहेत. पाणी, लिंबू, तमालपत्र, तुरटी, बेकींग सोडा, मीठ, कापूर आणि डेटॉल.

सर्वप्रथम एक ग्लासभर पाणी घ्या. त्यात अर्धा लिंबू आणि तीन ते चार तमालपत्राची पाने टाका. लिंबातील आम्ल आणि तमालपत्राचा उग्र वास झुरळांना पळवतो. हे पाणी नीट उकळून घ्या.

पाणी उकळत असताना त्यात तुरटीचा एक छोटा खडा टाका. तुरटीचा गंध झुरळांना सहन होत नाही, त्यामुळे ती जागा सोडून जातात. मिश्रण उकळून झाल्यावर पाणी नीट गाळून घ्या.

Kill Cockroach | हे औषध कसे वापरावे? मिळणार जबरदस्त परिणाम :

गाळलेलं पाणी अजून कोमट असतानाच त्यात एक चमचा बेकींग सोडा घाला. त्यामुळे पाण्यात फेस येईल. नंतर त्यात मीठ आणि थोडी कापूर पावडर मिसळा. शेवटी या मिश्रणात थोडं डेटॉल घालून औषध तयार करा. हे मिश्रण कोमट असतानाच वापरावं, कारण त्यावेळी त्याचा परिणाम अधिक होतो.

हे तयार मिश्रण स्प्रे बाटलीत भरून घरातील झुरळं दिसणाऱ्या ठिकाणी जसं की स्वयंपाकघर, बेसिनखाली, फ्रिजच्या मागे किंवा कचऱ्याजवळ फवारावं. नियमित 2 ते 3 आठवडे वापरल्यास झुरळं पूर्णपणे नाहीशी होतात. या उपायात कोणतेही केमिकल नसल्याने हे पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे.

News Title: Kill Cockroaches Naturally at Home for Just ₹10 | Easy DIY Remedy with Alum, Lemon, and Bay Leaves | No Chemicals Needed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now