Kiara Advani Baby Girl | बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक असलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara advani) यांच्या आयुष्यात नवा आनंददायी टप्पा सुरू झाला आहे. आज, १६ जुलै २०२५ रोजी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सामान्य प्रसूतीद्वारे हा शुभ क्षण घडला असून आई आणि बाळ दोघीही सुखरूप आहेत.
सध्या या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर “बॉलीवूडला नवीन प्रिन्सेस मिळाली!” अशा प्रतिक्रिया ट्रेंड होत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या चाहत्यांनी दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत त्यांच्या कन्येच्या आगमनाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नानंतरचा पहिला गोड आनंद :
सिद्धार्थ आणि कियाराने फेब्रुवारी २०२३ मध्ये राजस्थानमध्ये राजेशाही थाटात विवाह केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी कियाराच्या गर्भवती असल्याच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला होता. आणि आज त्या चर्चांना एका सुंदर सत्यात रूपांतर झालं आहे. अभिनेत्री कियाराने मुलीला जन्म दिल्याची बातमी जाहीर होताच, टि्वटर आणि इंस्टाग्रामवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. (Kiara Advani Baby Girl)
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ‘शेरशाह’ या चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच ऑफ-स्क्रीन बॉन्डिंगही सर्वांनाच भावली. त्यांचा प्रेमसंबंध, साखरपुडा, लग्न आणि आता पालकत्व असा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Kiara Advani Baby Girl | अभिनेत्री कियाराच्या करिअरचा यशस्वी टप्पा :
कियारा अडवाणी लवकरच ‘वॉर २’ या बिग बजेट चित्रपटात झळकणार असून तिच्या अभिनयकौशल्याची मोठी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हे दोघंही त्यांच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही हा आनंदाचा क्षण घडला आहे. (Kiara Advani & Sidharth Malhotra Baby Girl)
या दोघांची जोडी त्यांच्या सौम्य स्वभाव, उच्चभ्रू जीवनशैली आणि सजग सार्वजनिक प्रतिमेसाठी ओळखली जाते. त्यांचं वांद्रे येथील ७० कोटींचं समुद्रकिनाऱ्यावरील घर, महालक्ष्मीमधील आलिशान अपार्टमेंट, आणि लक्झरी गाड्यांचा ताफा यामुळे हे कपल कायमच चर्चेत राहिलं आहे.






