Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर-जरी बक्ष यांचा ७३९ वा उरुस १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान खुलताबाद येथे सुरू आहे. या उरुसाला हजारो भाविक हजेरी लावतात. मोठ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड यांनी वाहतुकीत मोठे बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
पर्यायी मार्गांची आखणी :
कन्नडहून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहतूक आता कन्नड – वेरुळ – कसावखेडा फाटा – वरझडी – माळीवाडा – शरणापुर फाटा मार्गे संभाजीनगरकडे येईल.
छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरुळकडून कन्नडकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली असून ती आता छ. संभाजीनगर – शरणापुर फाटा – माळीवाडा – वरझडी – कसाबखंड फाटा – वेरुळ मार्गे जाईल. (Chhatrapati Sambhajinagar traffic diverted)
फुलंब्री व सुलतानपूरकडील वाहतूकही छ. संभाजीनगर – शरणापुर फाटा – माळीवाडा – वरझडी – कसाबखंड फाटा – वेरुळ मार्गे कन्नडकडे वळवण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar | बदल किती दिवस कायम? :
हे वाहतूक बदल १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत उरुस सुरू असेपर्यंतच लागू राहतील. पोलिसांनी भाविक व नागरिकांना सूचित केले आहे की, गर्दीच्या ठिकाणी जड वाहनांचा प्रवेश बंद असेल. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे.






