गिरीश महाजन यांच्यावर महिला IAS अधिकाऱ्याशी संबंधांचा आरोप; राजकारणात खळबळ

On: April 7, 2025 11:22 AM
Girish Mahajan
---Advertisement---

Girish Mahajan | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारा आरोप समोर आला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक आरोप केले आहेत. एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी महाजन यांचे संबंध असल्याचा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला असून, या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

खडसेंचा दावा

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, “ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत गंभीर माहिती दिली. त्यांच्या मते, महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध आहेत. मला त्या अधिकाऱ्याचं नाव माहिती आहे, पण ते जाहीर करणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.”

तसेच, “अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली होती. शाह यांनी थेट महाजन यांना विचारलं की, तुमचे त्या महिला अधिकाऱ्याशी दिवसभरात शंभर वेळा कॉल झाले आहेत. आमच्याकडे कॉल डिटेल्स आहेत,” असा खळबळजनक दावा खडसे यांनी केला.

खडसेंनी हेही सांगितलं की, “मी अमित शाह यांना भेटत असतो. पुढच्या भेटीत यासंदर्भात विचारणार आहे की यात तथ्य किती आहे.”

संजय शिरसाटांचे प्रत्युत्तर

या आरोपावर मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी गिरीश महाजन यांची जोरदार पाठराखण केली आहे. त्यांनी म्हटलं, “हे आरोप फक्त राजकीय हेतूने केले जात आहेत. एकनाथ खडसे यांनी नवा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने कुठे तक्रार केली आहे का? नसल्यास, अशा प्रकारचे आरोप निराधार आहेत.” शिरसाट यांनी पुढे सांगितलं, “जर अमित शाह यांच्याकडे खरोखरच पुरावे असते, तर गिरीश महाजन यांना मंत्रिपद कसे मिळाले असते? सध्याचे मंत्रिपद हे सर्व तपासणीनंतरच देण्यात आले आहे.”

या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा व्यक्तिवाद, सत्तासंघर्ष आणि अंतर्गत कुरघोडी उफाळून आली आहे. आता या प्रकरणावर भाजप किंवा गिरीश महाजन यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया काय येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 Title: Khadse Alleges IAS Link with Girish Mahajan

Keywords: girish mahajan controversy, eknath khadse allegations, ias officer connection, amit shah meeting, sanjay shirsat defense, गिरीश महाजन वाद, एकनाथ खडसे आरोप, महिला आयएएस संबंध, अमित शाह बैठक, संजय शिरसाट प्रतिक्रिया

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now