“ही लढाई हिंदुत्वाची, आपला धर्म वाचवायचा..”; केतकी चितळेचा नवा व्हिडिओ समोर

On: November 21, 2024 9:54 AM
Ketaki Chitale
---Advertisement---

Ketaki Chitale | अभिनेत्री केतकी चितळे ही कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहत असते. विविध मुद्द्यांवर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडत असते. केतकीला (Ketaki Chitale ) दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे अटक देखील झाली होती. अशात तिने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

केतकीने निवडणुकीबाबत एक पोस्ट केली आहे. तिने एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यावर केतकीने आपलं मत मांडलं आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल झाला आहे. काल राज्यभरात विधानसभेसाठी मतदान पर पडले. केतकीने देखील मतदानाचा हक्का बजावला. यानंतर तिने एका व्हिडिओद्वारे महत्वाचे आवाहन केले.

केतकी चितळेचा व्हिडिओ व्हायरल-

केतकीने एका ऑटो रिक्षात हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओत ती मतदानानंतर शाई लावलेले बोट दाखवत आहे. “मी माझं मत दान केले आहे. तुम्ही केलं का? नसेल केलं तर मतदान जरूर करा. ही लढाई हिंदुत्वाची आहे. आपल्याला धर्म वाचावायचा आहे. जर लव्ह जिहाद होऊ शकतं. लँड जिहाद होऊ शकतं आणि वोट जिहाद होऊ शकतं. सरळ म्हणतायंत वोट जिहाद.. तर मग आपणंही लढलं पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी…हर हर महादेव.” असं केतकी (Ketaki Chitale ) म्हणाली आहे.

केतकीहा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे. तिच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये धर्म वाचवण्यासाठी लढलं पाहिजे, असं म्हटलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी तीच्या या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच केतकीने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. एका रॅलीत मुस्लिम कार्यकर्ते हिरव्या रंगाचा झेंडा तसंच मनोज जरांगे पाटलांचा फोटो घेऊन एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत असतानाचा व्हिडिओ तिने पोस्ट केला होता. केतकी (Ketaki Chitale ) नेहमीच अशा व्हिडिओद्वारे आपले मत मांडत असते. अशात तिचा हा नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

News Title – Ketaki Chitale new video viral

महत्त्वाच्या बातम्या-

विधानसभेत जरांगे फॅक्टर ठरणार फेल?, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

‘सुशीलकुमार व प्रणिती शिंदे भाजपची बी टीम’; सोलापुरात ठाकरे गटाचा संताप

भाजपला बसणार धक्का, ‘इतक्या’ जागा मिळणंही कठीण?; एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग, देवी लक्ष्मी कुणाच्या इच्छा पूर्ण करणार?

परळीत जोरदार राडा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

Join WhatsApp Group

Join Now