Kashmir | पहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. बांदीपोरा (Bandipora) येथे सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला असून दोन पोलीस गोळीबारात जखमी झाले आहेत. काश्मीरच्या काही भागांत १०० हून अधिक दहशतवादी सक्रिय असल्याचा दावा केला जात आहे.
बांदीपोरा-उधमपूरमध्ये चकमकी
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. बांदीपोरा भागात सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू असून, जखमी दहशतवाद्याचा शोध घेतला जात आहे. या गोळीबारात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही गोळी लागली आहे. पहलगाम (Pahalgam) नंतरची ही चौथी मोठी चकमक असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी गुरुवारी, उधमपूर (Udhampur) जिल्ह्यातील डूडू बसंतगड (Dudu Basantgarh) येथे झालेल्या चकमकीत ६ पॅरा एसएफचे (6 PARA SF) शिपाई झंटू अली शेख (Sepoy Jhantu Ali Shaikh) हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. व्हाईट नाईट कॉर्प्स (White Knight Corps) आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी एक्स (X) (पूर्वीचे ट्विटर) द्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.
घुसखोरीचा प्रयत्न फसला
दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी बांदीपोरा भागातून लष्कर-ए-तैयबा (LeT) (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेच्या चार ओव्हर ग्राऊंड वर्कर्सना (OGWs) अटक केली. मोहम्मद रफीक खांडे (Mohammad Rafiq Khanday) आणि मुख्तार अहमद डार (Mukhtar Ahmad Dar) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ते पोलीस आणि स्थानिकांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते.
गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून चिनी हँडग्रेनेड, ७.६२ मिमी मॅगझिन आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच, उरी सेक्टरमध्ये (Uri sector) नियंत्रण रेषेजवळ (LoC) दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला, ज्यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून दोन असॉल्ट रायफल, दारुगोळा, पाकिस्तानी चलन (Pakistani currency) आणि इतर साहित्य जप्त केले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
Title : Kashmir Ops: Terrorist Hurt in Bandipora, Infiltration Bid Foiled






