Karuna Sharma | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील पोटगी प्रकरणाची सुनावणी माझगाव सत्र न्यायालयात पार पडली. न्यायालयाने करुणा शर्मा यांना काही पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले असून, पुढील सुनावणी ५ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
करुणा शर्मा यांची प्रतिक्रिया-
सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि सांगितले की, “आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मला काही पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत, जे मी ५ तारखेला सादर करणार आहे.” त्यांनी पुढे विचारणा केली की, “धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे, तर मग मी पत्नी नाही, असं कसं होऊ शकतं?” त्यांनी स्पष्ट केले की, (Karuna Sharma) या संदर्भातील सर्व पुरावे न्यायालयात सादर केले जातील.
न्यायालयीन विचारणा-
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या वकिलांना विचारणा केली की, “जर मुलं तुमची आहेत, तर त्यांच्या आईबद्दल काय भूमिका आहे?” यावर मुंडे (Karuna Sharma) यांच्या वकिलांनी उत्तर दिले की, “धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे, परंतु करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत विवाह केला नाही.”
न्यायालयाने करुणा शर्मा यांना निर्देश दिले आहेत की, त्या आपल्या विवाहाचे आणि इतर संबंधित पुरावे ५ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी सादर करावेत. या प्रकरणातील पुढील निर्णय या पुराव्यांच्या आधारे घेतला जाईल.
जेव्हा मुंडे यांनी स्वतः मुलांना स्वीकारलं आहे, नावं दिली आहेत, तेव्हा करुणा शर्मा त्यांच्या आई का नाहीत? यावर मुंडेंच्या (Dhananjay Munde) वकिलांनी सांगितलं की, केवळ काही काळ एकत्र राहणं आणि मुले होणं म्हणजे विवाह होतो, असा निष्कर्ष काढता येत नाही. शिवाय करुणा शर्मा आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, त्यांचा वर्षिक उत्पन्न सुमारे 15 लाख रुपये आहे आणि त्या नियमित कर भरतात, म्हणूनही त्यांना पोटगीची गरज नाही, असं मत त्यांनी मांडलं.






