करुणा शर्मांनी स्पष्टंच सांगितलं म्हणाल्या, “धनंजय मुंडेंकडे नाचणाऱ्या गाणाऱ्या वेश्या…”

On: April 10, 2025 4:33 PM
karunda munde
---Advertisement---

Karuna Sharma | माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत न्यायालयाच्या निर्णयानंतर मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या विवाहासंदर्भात कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले असून, करुणा शर्मा यांनीही या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा शर्मांची प्रतिक्रिया

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यात विवाह झाला नव्हता, असा दावा मुंडे यांनी न्यायालयात केला होता. मात्र न्यायालयाने बुधवारी दिलेल्या लेखी आदेशात दोघांचे संबंध विवाहासारखेच असल्याचे नमूद केले आहे. करुणा शर्मा यांनी दोन मुलांना जन्म दिला असून, एकत्र वास्तव्यास शिवाय हे शक्य नव्हते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

करुणा शर्मांनी (Karuna Sharma)  धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. “आता फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. त्यांना मोठी शिक्षा होणार आहे. मंत्रीपद गेलेच आहे, आता आमदारकीही जाणार आहे. असे लोक समाजात राहण्यालाही पात्र नाहीत,” असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. पुढे त्या म्हणाल्या, या गुंड लोकांकडे अडीच हजार कोटीची संपत्ती यांच्याकडे कुठून आली. यांच्याकडे नाचणाऱ्या गाणाऱ्या वेश्या आहेत. हे हेलिकॉप्टरमधून फिरतात, कुठून आलं हे सर्व यांच्याकडे आणि आज स्वत:ची बायको दोन मुलांसोबत रस्त्यावर कोर्टाच्या चकरा मारते. गेल्या साडेतीन वर्षांपासून कोर्टाच्या चकरा मारतेय.

त्याग, अत्याचार आणि संपत्तीवर प्रश्न

“मी कोणती नाचणारी किंवा ठेवलेली बाई नाही. मी दोन मुलांना जन्म दिलाय. त्यांच्या सुखदुःखात पूर्ण सहभाग घेतला आहे. २७ वर्षे मंगळसूत्र गहाण ठेवून मी त्यांच्यासोबत राहिले. आज जेव्हा ते मंत्री झालेत, तेव्हा दुसऱ्याच स्त्रिया त्यांच्या पैशावर मजा करत आहेत,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

याशिवाय त्यांनी असा धक्कादायक खुलासाही केला की, त्यांच्या वहिनीसोबत बलात्कार झाला होता आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली. “२००८ मध्ये मी स्वतः विष प्राशन केलं होतं. पाच दिवस रुग्णालयात होते. या माणसाने कोणतीच मर्यादा राखलेली नाही,” असे करुणा शर्मा यांनी म्हटले.

“यांच्याकडे अडीच हजार कोटींची संपत्ती कुठून आली? यांच्यासोबत नाचणाऱ्या स्त्रिया आहेत. हे हेलिकॉप्टरमधून फिरतात. पण मी, त्यांची बायको, दोन मुलांसोबत रस्त्यावर कोर्टाच्या चकरा मारतेय. आता फक्त सुरुवात आहे. त्यांना शिक्षा होणारच,” असा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा केला.

News Title – Karuna Sharma Attacks Dhananjay Munde in Court Row

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now