‘माझा पती एवढा वाईट नाही पण….’; करुणा शर्मांचे कोणावर आरोप?

On: April 5, 2025 4:06 PM
Karuna Sharma
---Advertisement---

Karuna Sharma |  धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रकरणात करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी माध्यमांसमोर मोठे दावे करत खळबळ उडवून दिली आहे. “माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते” असा थेट आरोप करत त्यांनी वैयक्तिक जीवनातील अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, “मी हिरोईन होऊ शकत होते, पण मी नवऱ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला,” असे सांगत त्यांनी भावनिक आणि आर्थिक संघर्ष मांडला.

कोर्टात पुरावे सादर

करुणा शर्मा यांनी कोर्टात विविध कागदपत्रं सादर केली असून, त्यात वसीयतनामा, अंगठ्याचा ठसा, सह्या, गॅरेंटरशी संबंधित पुरावे, तसेच धनंजय मुंडे यांच्यासोबतचे बँक खाते यांचा समावेश आहे. “माझ्या घराच्या कर्जावर धनंजय मुंडे गॅरेंटर आहेत. वसीयतनाम्यावर त्यांच्या सह्या आहेत. पुरावे नसते, तर मी कोर्टात आलेच नसते,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांनी यासोबतच सांगितलं की, “माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, ते मी मीडियासमोर सादर करणार आहे. या प्रकरणावर धनंजय मुंडे फक्त झाकून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मला आणि माझ्या मुलांना सातत्याने धमकावलं जातं.”

२० कोटींच्या सौद्याचा आरोप

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं, “माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला मुंडेंनी २० कोटी रुपये देऊ केले होते. पती एवढा वाईट नाही, पण त्याने दलाल लोक बाजूला सांभाळले आहेत. माझ्या नावावर काहीच नाही. माझं आयुष्य त्यांनी रस्त्यावर आणलं.”

“आज मी गाडी घेऊन कोर्टात आले, तरी त्यावरूनही वाद झाला. मीडियासमोर आणि समाजात मला अपमानित केलं जातं. पण मी पहिली बायको आहे, हे मी सिद्ध करणारच,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

न्यायालयीन सुनावणीत पुढचं वळण महत्त्वाचं

सध्या पोटगी प्रकरण न्यायालयात सुरू असून, करुणा शर्मा यांनी १५ लाख रुपयांची पोटगी मागितली आहे. न्यायालयाने याआधी त्यांना २ लाख रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता या प्रकरणात सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा पुढील निर्णय काय येतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Title: Karuna sharma Alleges ₹20 Cr Offer to Stop Marriage

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now