“धनंजय मुंडेंनी 20 कोटींचा सौदा केलेला,”; करुणा शर्मांनी सगळंच सांगून टाकलं

On: April 5, 2025 3:53 PM
Karuna Sharma
---Advertisement---

karuna sharma  | धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील पोटगी प्रकरणात नवे वळण आले असून करुणा शर्मांनी माध्यमांसमोर खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबई सत्र न्यायालयात आज दोघांमधील सुनावणी झाली. यावेळी करुणा शर्मा यांनी न्यायालयात विविध पुरावे सादर केले आणि माध्यमांपुढेही आपली बाजू मांडली.

२० कोटींचा सौदा ठेवला होता तयार?

करुणा शर्मा यांनी म्हटलं, “मला एका चित्रपटासाठी हिरोईनची ऑफर आली होती, पण मी नवऱ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते. माझा पती एवढा वाईट नाही, पण त्याने आजूबाजूला दलाल लोक सांभाळले आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “माझ्या नावावर काहीही नाही. मला आणि माझ्या मुलांना सातत्याने धमक्या दिल्या जातात. माझं संपूर्ण जीवन उध्वस्त केलं आहे. आज मी गाडी घेऊन कोर्टात आले, तरी त्यावरून हंगामा केला गेला. मला रस्त्यावर आणणारा धनंजय मुंडे आहे.”

न्यायालयात पुराव्यांवरून वाद

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा यांनी सादर केलेले सर्व पुरावे खोटे असल्याचा दावा केला आहे. त्यात वसीयतनाम्यातील सह्या, अंगठ्याचे ठसे आणि इतर कागदपत्रांच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना करुणा शर्मा म्हणाल्या, “मी सादर केलेल्या वसीयतनाम्यावर धनंजय मुंडे यांचाच अंगठा आहे. राज घनवट यांचीही सही आहे. माझ्या घराच्या कर्जावर मुंडे गॅरेंटर आहेत.”

तसेच, “माझ्याकडे महत्त्वाचं रेकॉर्डिंग आहे, जे मी लवकरच मीडियासमोर आणणार आहे. माझं आणि मुंडे यांचं एकत्र अकाउंट देखील आहे,” असा दावा त्यांनी केला.

आपली बाजू स्वतः कोर्टात मांडण्याचा प्रयत्न

सुनावणीदरम्यान करुणा शर्मा यांनी “माझे वकील नीट बाजू मांडत नाहीत, त्यामुळे मी स्वतःच आपली बाजू मांडते,” असंही कोर्टात म्हटलं. मात्र, न्यायालयाने त्यांना समजावत सांगितले की, “वकिलांना आपलं काम करू द्या, आम्ही योग्य निर्णय घेऊ.”

Title: Karuna Sharma Alleges ₹20 Cr Deal by Munde

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now