सिंगल की मिंगल?, कार्तिक आर्यनचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा

On: January 17, 2025 12:19 PM
Kartik Aaryan Dating
---Advertisement---

Kartik Aaryan l अभिनेता कार्तिक आर्यनचे (Kartik Aaryan) नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. विशेषतः, त्याच्या आगामी चित्रपटातील नायिकेसोबत त्याचे नाव जोडले जाण्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. या सर्व चर्चांवर कार्तिकने मौन बाळगणेच पसंत केले होते. मात्र, आता त्याने यावर मौन सोडलं आहे.

एका पुरस्कार सोहळ्यात (Award Function) आपल्या रिलेशनशिप स्टेटसबाबत (Relationship Status) खुलासा केला आहे. कार्तिक आर्यनने तो सिंगल असल्याचं सांगितलं आहे. जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये असेन तेव्हा मी स्वतः या गोष्टीचा खुलासा करेन असं कार्तिकने म्हटलं आहे.

“मी सिंगल (Single) आहे, पूर्णपणे सिंगल आहे. माझा जास्तीत जास्त वेळ चित्रपटांच्या कामात जातो. त्यामुळे, इतर कामांसाठी वेळ मिळत नाही. आणखी कुठे जाण्यासाठी किंवा कोणाला भेटण्यासाठी वेळच नसतो,” असे कार्तिकने स्पष्ट केले.

Kartik Aaryan l कार्तिकचे आगामी चित्रपट

मागच्या वर्षी कार्तिकचे ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘भूल भुलैया ३’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. सध्या तो अनुराग बासू (Anurag Basu) यांच्या ‘आशिकी ३’ (Aashiqui 3) मध्ये तृप्ती डिमरीसोबत (Tripti Dimri) दिसणार आहे.

कार्तिकच्या या खुलाशामुळे त्याच्या रिलेशनशिपबद्दलच्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कामावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

News Title: Kartik Aaryan Declares He is “100% Single”

महत्वाच्या बातम्या-

नवऱ्याला बिअर पाजली नंतर बॉयफ्रेंडला बोलवलं, पत्नीच्या कृत्यानं पोलिसही हादरले

एसटी महामंडळाकडून अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश, आता अतिमोबाईल वापराल तर…

‘चार मुले जन्माला घाला’; ‘या’ बड्या नेत्याचं ब्राह्मण समाजाला आवाहन

शेतात अर्धांगवायूचा झटका, मालकाने हाक देताच बैल सर्जा मतदीला धावला

‘हातात लांब ब्लेड होता, तो जेहबाबाकडे जाऊ लागला’; केअरटेकरने सांगितला हल्ल्याचा थरार

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now