Sunjay Kapur Death | करिश्मा कपूरचा माजी पती आणि उद्योजक संजय कपूरच्या मृत्यूच्या बातमीने १२ जून रोजी सर्वत्र खळबळ उडाली होती. लंडनमध्ये पोलो खेळताना त्याला मधमाशीने चावा घेतल्यामुळे श्वास घ्यायला त्रास झाला आणि त्यातून हृदयविकाराचा झटका आला, असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र आता संजयच्या मृत्यूमागील खरं वैद्यकीय कारण समोर आलं असून, ते नैसर्गिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. (Sunjay Kapur Death)
काय आहे संजय कपूरच्या मृत्यूमागील खर कारण? :
ब्रिटनमधील सरे कोरोनर ऑफिसने संजयच्या पत्नी प्रिया सचदेव कपूरला पाठवलेल्या अधिकृत पत्रात मृत्यूचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यानुसार, संजय कपूरचं निधन हे लेफ्ट वेंट्रिकुलर हायपरट्रॉफी (LVH) आणि इस्केमिक हार्ट डिसीज मुळे झालं.
LVH (Left Ventricular Hypertrophy): हृदयाच्या डाव्या बाजूच्या वेंट्रिकलच्या स्नायूंची भिंत जाड होणं, त्यामुळे हृदयाला अधिक परिश्रम घ्यावे लागतात. (Sunjay Kapur Death)
इस्केमिक हृदयरोग: हृदयाच्या स्नायूंना पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. हे सामान्यतः धमनीतील ब्लॉकेजमुळे होतं.
Sunjay Kapur Death | कसलंही कटकारस्थान नाही :
Coroners and Justice Act 2009 अंतर्गत तपास अधिकृतपणे बंद करण्यात आला आहे. कोरोनर कार्यालयाने स्पष्ट केलं की, या प्रकरणात कोणतंही गुन्हेगारी कारण आढळून आलेलं नाही. त्यामुळे मृत्यू पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
संजय कपूरच्या आई राणी कपूर यांनी मात्र या अहवालानंतरही संजयच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या हत्येचा आरोप करत संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूरवर आर्थिक फायद्यासाठी कट रचल्याचा दावा केला आहे.
प्रियाच्या हालचाली आणि संपत्तीवरील लक्ष :
संजयच्या निधनानंतर प्रिया सचदेवने तिचं नाव बदलून प्रिया एस. कपूर केलं आहे आणि ती आता संजयच्या कंपनी सोना कॉमस्टारच्या बोर्डात सहभागी झाली आहे. (Sunjay Kapur Death)
विशेष म्हणजे संजय कपूरच्या नावावर सुमारे ३०,००० कोटींची संपत्ती आहे. यावरून आता प्रिया, त्यांची मुलगी सफिरा, आणि करिश्मा कपूरच्या मुलांना काय वाटा मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.






