‘हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही’; करिनाचा धक्कादायक खुलासा

On: January 18, 2025 12:59 PM
Kareena Kapoor statement
---Advertisement---

Kareena Kapoor statement l बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर-खान हिचा जबाब नोंदवला आहे. या जबावातून पोलिसांना आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. घरात घुसलेला हल्लेखोर अतिशय आक्रमक (Aggressive) होता, असे करीनाने पोलिसांना सांगितले आहे.

करीनाचा जबाब आणि तपासाला (Investigation) नवी दिशा

१६ जानेवारी रोजी सैफ अली खानच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोराने (Unknown Attacker) त्याच्यावर जीवघेणा हल्ला (Deadly Attack) केला. हा अज्ञात हल्लेखोर चोरीच्या (Theft) प्रयत्नात होता, असे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, आता करीनाच्या जबाबातून या प्रकरणात मोठा ट्विस्ट (Twist) आला आहे. करीनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, “जेव्हा आरोपी घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता, पण त्याने घरातून काहीही चोरी केली नाही.” या जबाबानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

करीनाने सांगितला हल्ल्याच्या रात्रीचा थरार

करीनाने पोलिसांना सांगितले की, “जेव्हा सैफसोबत भांडताना, झटापट (Scuffle) करताना आरोपी खूप आक्रमक होता, पण कुटुंब कसेबसे त्याच्यापासून दूर पळून जाण्यात आणि घराच्या १२ व्या मजल्यावर (12th Floor) जाण्यात यशस्वी झाले.”

पोलीसांनी (Police Sources) दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे करीना खूपच चिंतेत (Worried) होती. ती चिंतेत असल्यामुळे तिची बहीण करिश्मा कपूर (Karishma Kapoor) तिला तिच्या घरी घेऊन गेली. करीनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात पुढे म्हटले आहे की, “दागिने (Jewelry) घरात समोर ठेवले होते, पण हल्लेखोराने त्यांना हातही लावला नाही.”

Kareena Kapoor statement l आरोपीच्या शोधासाठी १० पथके तैनात

मुंबई (Mumbai) पोलिसांचे डीसीपी झोन-९ दीक्षित गेडाम (Dikshit Gedam) यांनी प्रसारमाध्यमांना (Media) दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या आरोपीने फायर एस्केपमधून (Fire Escape) घरात प्रवेश केला.

आतापर्यंतच्या तपासात एका आरोपीची ओळख पटली असून त्याला अटक करण्यासाठी १० पथके (Teams) तैनात करण्यात आली आहेत. ही पथके वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. यापूर्वी, घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी सैफ अली खानच्या घरी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमनेही (Forensic Team) आरोपींच्या बोटांचे ठसे (Fingerprints) सापडल्याचा दावा केला होता.

Title : Kareena Kapoor’s statement recorded in Saif Ali Khan attack case

महत्वाच्या बातम्या- 

रिलायन्स जिओचं मोठं पाऊल, Airtel आणि Vi पुन्हा एकदा टाकलं मागे

मोठी बातमी समोर; अर्जुन कपूर, भूमी पेडणेकरच्या शूटिंग दरम्यान दुर्घटना

आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही!

वजन कमी करण्याचा सोपा मार्ग; ‘या’ 3 ट्रिक्स वापरून घटवा झटपट वजन

धनंजय मुंडेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, तटकरे तोडांवर पडले

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now