एकट्या करीना कपूरची एकूण संपत्ती किती?, आकडा वाचून थक्क व्हाल!

On: January 25, 2025 4:36 PM
---Advertisement---

Kareena Kapoor | सध्या पतौडी कुटुंब फार चर्चेत आहे. नुकताच सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे. एका अज्ञात इसमाने त्याच्या घरात घुसून हा हल्ला केला. त्यामध्ये सैफ गंभीर जखमी (Seriously Injured) झाला आहे. काल त्याच्यावर शस्त्रक्रियाही (Surgery) पार पडली. एवढी सुरक्षा असूनही हा प्रकार घडलाच कसा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सैफची पत्नी करीना कपूर खानही या प्रकरणी खूप चिंतेत आहे.

करीनाची संपत्ती आणि कारकीर्द-

सैफ हा खानदानी गर्भश्रीमंत आहे. शिवाय, करीनानेसुद्धा (Kareena Kapoor) आपल्या हिमतीवर बराच मोठा डोलारा उभा केला आहे. तिची स्टाइल इतकी सुंदर आहे की ती आजकालच्या मुलांनाही लाजवेल. आजही ती कोट्यवधी रुपये फी आकारते.. करीनाच्या सौंदर्याबद्दल , ग्लॅमरबद्दल, आकर्षक लूकबद्दल आणि तिच्या रागाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. आजही लोक तिला ‘पू’ म्हणून ओळखतात. करण जोहरने ‘कभी खुशी कभी गम’ मधील ‘पू’च्या भूमिकेसाठी (Role) तिची निवड केली होती.

आजही लोक तिच्या त्या भूमिकेला खूप पसंत करतात. करीना कपूर (Kareena Kapoor) 44 वर्षांची झाली आहे पण तिची फिटनेस आणि त्वचा पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही. कपूर घराण्याची लाडकी करीनाची बहीण करिश्मा कपूर आहे, जिने मुलींसाठी अभिनयाचा मार्ग मोकळा केला. आपल्या बहिणीला पाहून करीनाही चित्रपटांमध्ये आली. ‘रेफ्युजी’ चित्रपटातून तिने पदार्पण केले आणि मागे वळून पाहिले नाही.

एकूण संपत्ती-

करीना कपूरची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे. ती भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये घेते. असे म्हटले जाते की, ती फक्त एका गाण्यासाठी 1.5 कोटी रुपये घेते. याचा अर्थ ती 4-5 मिनिटांच्या गाण्यासाठी 1.5 कोटी रुपये घेते. तर सैफ  ही संपत्तीचा आकडा कमी नाहीये.

सैफ अली खानची एकूण संपत्ती-

सैफचे संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहे. त्यांची आई शर्मिला टागोर तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. बहीण सोहा आणि तिचा नवरा कुणाल खेमू हे देखील चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहेत. सैफची मुलगी सारा अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांनीही बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सैफची जीवनशैली एखाद्या राजापेक्षा कमी नाही. सैफ अली खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची एकूण संपत्ती 150 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,120 कोटी रुपये आहे. अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत त्यांची संपत्ती 70 टक्क्यांनी वाढली आहे.

News Title : Kareena Kapoor’s net worth

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now