“हो, पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट माझ्यासाठी…”, करीना कपूरच्या ‘त्या’ वक्तव्याने हादरलं होतं बॉलिवूड

On: January 14, 2025 5:08 PM
करीना कपूर - Kareena Kapoor
---Advertisement---

बाॅलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor), जिला चाहते प्रेमाने ‘बेबो’ म्हणतात, नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या हृदयात खास जागा निर्माण करते. तिचे चित्रपट आजही बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात. प्रोफेशनल असो किंवा पर्सनल लाईफ, करीना नेहमीच चर्चेत असते. मात्र, सध्या तिच्या एका जुन्या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

काय आहे प्रकरण?

करीना कपूर तिच्या बोल्ड आणि बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. अलीकडेच, तिच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत करीना एका धाडसी विषयावर मत व्यक्त करताना दिसते. ही मुलाखत ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय टॉक शोमधील असून, त्या वेळी ती अभिनेता इम्रान खानसोबत सहभागी झाली होती.

करण जोहरचे वादग्रस्त प्रश्न-

‘कॉफी विथ करण’मधील रॅपिड फायर राउंडदरम्यान करण जोहरने करिनाला काही वादग्रस्त प्रश्न विचारले. यामध्ये त्याने पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टसंदर्भात प्रश्न विचारला होता. करणने विचारलं, “पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा आकार महत्त्वाचा आहे का?” इम्रान खानने या प्रश्नाचं उत्तर ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. थोडा विचार केल्यानंतर करिनाने बोलताना सांगितलं की, “हो, पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा आकार तिच्यासाठी महत्त्वाचा आहे.”

या विधानानंतर करीना चर्चेत आली होती. सोशल मीडियावर तिच्या या उत्तराची जोरदार चर्चा झाली. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, करिनावर या सगळ्याचा फारसा परिणाम झाला नाही. ती आपल्या खास आणि धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असते.

करीना कपूरची चर्चेत असण्याची सवय-

प्रत्येक वेळी करीना तिच्या भूमिकांमुळे किंवा वक्तव्यांमुळे लोकांच्या चर्चेचा विषय बनत असते. तिच्या या व्हायरल मुलाखतीने पुन्हा एकदा तिच्या स्पष्टवक्तेपणाची झलक दाखवली आहे, मात्र तिच्या या जुन्या व्हिडिओची क्लिप नव्याने व्हायरल झाल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Title: kareena-kapoor-viral-interview-koffee-with-karan-bold-statement

Join WhatsApp Group

Join Now