Kareena Kapoor | जेव्हा कधी बॉलिवूडमधील कोणती अभिनेत्री थेट आणि उघडपणे बोलते, असा विषय निघतो, तेव्हा करीना कपूर (Kareena Kapoor) हे नाव हमखास पुढे येतं. अनेकदा तिने आपल्या मनातलं अगदी स्पष्टपणे आणि बेधडकपणे सांगितलं आहे. यामुळे ती चर्चेतही राहिली आणि काही वेळा वादातही अडकली. एकदा तर करण जोहर (Karan Johar) च्या लोकप्रिय शोमध्ये ती पुरुषांच्या खासगी अवयवांबद्दलही बोलली, ज्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये प्रचंड आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.
‘कॉफी विथ करण’मध्ये करीनाचे बोल्ड उत्तर-
‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या बॉलिवूडच्या सर्वात वादग्रस्त टॉक शोपैकी एक मानल्या जाणाऱ्या कार्यक्रमात करीना एका एपिसोडमध्ये अभिनेता इमरान खान (Imran Khan) सोबत सहभागी झाली होती. शोमधील रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने करीनाला थोडेसे संवेदनशील आणि खळबळजनक प्रश्न विचारले. सुरुवातीला करीनाने काही प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला, पण करणच्या आग्रहामुळे ती अखेर तयार झाली.
साइजवर प्रश्न, करीनाचं थेट उत्तर-
करणने थेट विचारलं, “Does size matter?” यावर करीना (Kareena Kapoor) काही क्षण गप्प राहिली. इमराननेही उत्सुकतेने मध्ये येऊन म्हटलं, “सर्व पुरुषांच्या वतीने, कृपया उत्तर द्या.” काही वेळ विचार करून करीना हसत उत्तर देते, “माझ्यासाठी साइज मॅटर करतो.” तिच्या या उत्तराने स्टुडिओतील वातावरण क्षणातच बदललं आणि सोशल मीडियावरही ही क्लिप प्रचंड चर्चेत आली.
View this post on Instagram
करीनाला वादांची सवय नाही-
करिनाच्या या उत्तराने तिच्यावर टीकाही झाली, पण तिला फारसा फरक पडला नाही. तिने नेहमीच आपल्या बोलण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवला आहे. तिच्या मते, सत्य बोलणं हेच महत्त्वाचं आहे आणि ती कोणाच्याही अपेक्षांमध्ये अडकत नाही. ‘कॉफी विथ करण’ शो अनेक चर्चित सेलिब्रिटींना त्यांच्या बेधडक उत्तरांमुळे प्रकाशझोतात आणतो.






