Kareena Kapoor | पाकिस्तानमधील एका रेव्ह पार्टीत करिना कपूरचा एआय आधारित अॅनिमेटेड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये करिनाच्या (Kareena Kapoor Khan) डिजिटल रूपाला पार्टीतील म्युझिक बीट्सवर डान्स करताना दाखवण्यात आलं आहे. मात्र, चाहत्यांच्या प्रतिक्रिया मात्र या व्हिडिओवर नकारात्मक दिसत आहेत.
प्रेक्षकांनी उत्साहात प्रतिसाद दिला-
पाकिस्तानी डीजे हमझा हारिस (Hamza Haris) याने या व्हिडिओची निर्मिती केली असून, तो स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवरून (Kareena Kapoor) व्हायरल केला. त्याने सांगितलं की, “या ट्रॅकवर मी खूप काळापासून काम करत होतो. शोसाठी ते वेळेत पूर्ण केलं आणि मग वाटलं की, काहीतरी दृश्यात्मक हवं. ट्रॅक तयार करताना मी ‘कभी खुशी कभी गम’ पाहत होतो आणि ‘पूह’चा प्रसिद्ध संवाद मला आठवला. म्हणून विचार केला, का नाही करिनाला नाचताना दाखवायचं? हे अनोखं, मजेशीर आणि रेव्हसाठी हटके होतं.”
View this post on Instagram
हमझा पुढे म्हणतो, “हे खूप यशस्वी ठरलं. प्रेक्षकांनी उत्साहात प्रतिसाद दिला. आता फक्त करण जोहर आणि करिना कपूरने हे पाहावं आणि त्यांना हे किती अप्रतिम आणि अनपेक्षित वाटलं, हे समजावं.”
नेटकऱ्यांनी केले टीकेचे सपाटे-
जरी डीजे हमझाने व्हिडिओवर मेहनत घेतली असली तरी, सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी या अॅनिमेशनवर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट केली, “हे अॅनिमेशन खूपच खराब आहे, आणि ती ऑफिसला चालली आहे असं का वाटतंय?” दुसऱ्याने लिहिलं, “ट्रॅक आणि अॅनिमेशन दोन्ही बंद करा.” तिसऱ्याने संतप्त प्रतिक्रिया देत लिहिलं, “हे करिना कपूर अजिबात नाहीये!”
हा व्हिडिओ एआय क्रिएटिविटीबाबतच्या चर्चांना नवा आयाम देतोय. मात्र, प्रसिद्ध कलाकारांच्या प्रतिमेचा वापर करताना चाहत्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, हेही लक्षात घेतलं जात आहे.






