मित्रांची साथ अन् जिद्दीने मिळालं यश; सर्व रूममेट बनले अधिकारी

On: November 2, 2025 11:42 AM
Pune News
---Advertisement---

Success Story |  ‘जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर सामान्य घरातील मुलगाही प्रशासनात उच्च पदावर जाऊ शकतो,’ हे कराडच्या (Karad) सुरज पडवळ (Suraj Padwal) यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राज्य कर विभागात एसटीआय (State Tax Inspector – STI) म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी आपले ध्येय मोठे ठेवले आणि आता महाराष्ट्र राज्य सेवेतून एसएसटी (SSTI – Class One Officer) या क्लास-वन पदावर त्यांनी दिमाखदार निवड मिळवली आहे.

रूममेट्सची प्रेरणा ठरली महत्त्वाची

सुरज पडवळ (Suraj Padwal) यांच्या या यशामागे त्यांच्या रूममेट (Roommate) मित्रांची प्रेरणा अत्यंत मोलाची ठरली आहे. विशेष म्हणजे, त्यांचे सर्व रूममेट मित्र-मंडळी आता विविध सरकारी खात्यांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सुरज सांगतात, “एसटीआय (STI) पद मिळाल्यावर मी थांबलो नाही. मनात मोठे ध्येय होते. सातत्य, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवला. आज क्लास-वन पदावर निवड झाल्याचा आनंद शब्दात सांगू शकत नाही.”

सुरज यांनी आपल्या यशाचे श्रेय मित्रांना देताना सांगितले, “प्रसाद चौगुले, राकेश गीते, अनिकेत साखरे, सुरज गाढवे, निलेश खाडे आणि संकेत देसाई यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. ‘तू यापेक्षाही मोठे यश मिळवू शकतोस’ या त्यांच्या विश्वासाने मला पुन्हा अभ्यासाला प्रवृत्त केले आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच मी हे यश गाठू शकलो.”

गावात शिक्षण, कुटुंबाचा आधार

सुरज (Suraj Padwal) यांचे संपूर्ण शालेय आणि पदवीपर्यंतचे शिक्षण कराडमध्येच (Karad) झाले. त्यांचे वडील निवृत्त शिक्षक असून आई गृहिणी आहे, तर बहीणदेखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. या संपूर्ण प्रवासात कुटुंबाचा भक्कम मानसिक आधार मिळाल्याचे ते सांगतात. त्यांनी अभ्यासासाठी काही क्लासेसचे मार्गदर्शनही घेतले, ज्यात भगरे सर आणि प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशासनात रुजू झाल्यानंतर नागरिकांना सहज आणि सुलभतेने मदत मिळावी, यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असे ध्येय सुरज (Suraj Padwal) यांनी व्यक्त केले आहे.

News Title- Karad Man Cracks MPSC Class One

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now