Kangana Ranaut l अभिनेत्री आणि विद्यमान खासदार कंगना राणौत या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असतात. खासदार होण्याआधी देखील कंगना त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असायच्या. मात्र आता खासदार झाल्यानंतर देखील त्या आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत आहेत. अशातच आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
भाजप नेत्याने दिला इशारा :
खासदार कंगना राणौत यांनी नुकतंच एका मुलाखतीत कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक जर्नल सिंग भिंद्रनवाले यांच्याविरोधात टिप्पणी केली आहे. कंगना यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना सक्त ताकीद देखील मिळाली आहे. कंगना यांनी चुकीची टिप्पणी करू नये, ज्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतील असं भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश म्हणाले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहित माजी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी कंगना यांना संत जर्नल सिंग आणि शीख समुदायाविरोधात अनावश्यक टिप्पणी करू नये. अशा खळबळजनक वक्तव्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. तसेच खासदार कंगना राणौत यांनी शिस्तीचं पालन देखील करावं.
Kangana Ranaut l कंगना नेमकी काय म्हणाली? :
सध्या कंगना राणौत त्यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. यामध्ये त्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची महत्वाची भूमिका साकारत आहेत. यावेळी कंगना राणौतने भिंद्रनवाले यांना पंजाबच्या इतिहासातील फूट पाडणारी व्यक्ती असं संबोधलं आहे. इतकंच नव्हे तर कंगनाने त्यांना ‘दहशतवादी’ असं देखील म्हटलंय. भिंद्रनवाले यांची शीख धर्माच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी असलेल्या दमदमी टकसालच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. जून 1984 साली ऑपरेशन ब्लूस्टार दरम्यान त्यांची हत्या करण्यात आली होती.
तसेच ते काही संत नव्हते तर तो एक दहशतवादी होता. हा आपल्या इतिहासाचा देखील एक भाग आहे, जो जाणीवपूर्वक लपवून ठेवला गेला आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दल सांगितलं जात नाही असं कंगना मुलाखतीत म्हणाली आहे.
News Title : Kangana Ranaut Statment On Bhindranwale
महत्वाच्या बातम्या –
विधानसभा निवडणूका ‘या’ तारखे दरम्यान होणार! भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार
सणासुदीच्या काळात खाद्य तेलाच्या किंमती वाढणार का?
राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु






