Kangana ranaut | पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगीर विनेश फोगटने 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा पराभव केला. या कामगिरीनंतर तिचे देशभर कौतुक होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर होण्याचा मान विनेश फोगटने मिळवला आहे.
तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच भाजपच्या खासदार कंगना राणौत (Kangana ranaut) यांनी तिच्यासाठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित विनेशला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांनी पोस्टमध्ये मागे झालेल्या कुस्तीगीरांच्या आंदोलनावरून टोमणाही मारला आहे.
कंगना राणौतची पोस्ट चर्चेत
कंगना यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विनेश फोगटचा फोटो पोस्ट करत त्याला लक्षवेधक कॅप्शन दिलं आहे. “भारताच्या पहिल्या सुवर्णपदकाची आशा आहे. विनेश फोगटने एकेकाळी कुस्तीगीरांच्या आंदोलनात भाग घेतला होता आणि तिथे तिने ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा दिल्या होत्या. तरीसुद्धा तिला देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी, सर्वोत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सोयीसुविधा देण्यात आल्या. लोकशाहीची आणि महान नेत्याचं हे सौंदर्य आहे.”, असं कंगना (Kangana ranaut) म्हणाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मागच्या वर्षी कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन केले होते. ब्रजभूषण यांनी सहा महिला कुस्तीगीरांचं शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या अन्यायाविरोधात कुस्तीपटूंनी आवाज उठवला होता.त्यावेळी विनेश फोगटने तिचे सर्व मेडल्स आणि पुरस्कार आणून रस्त्यावर ठेवले होते.हे आंदोलन तेव्हा खूप गाजलं होतं.

दरम्यान, विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विनेशने उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह विनेशने भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले आहे. गेल्या 16 वर्षांचा वारसा कायम ठेवत विनेशने कुस्तीत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे.(Kangana ranaut)
विनेशची आज, बुधवार 7 ऑगस्ट रोजी सुवर्णपदकासाठी अंतिम फेरीत अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँडशी लढत होणार आहे. यावेळी विनेश फोगटकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. विनेशने सुवर्णपदक मिळवले तर ती ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीत सुवर्ण जिंकणारी पहिली कुस्तीपटू ठरेल.
News Title : Kangana ranaut sarcastically congratulated vinesh phogat
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ महिलांना मिळणार 10 हजारांचा लाभ? सरकारची नवीन योजना
विनेश फोगटचा गोल्ड मेडलसाठीचा LIVE सामना कधी व कुठे पाहता येणार?
रितेश देशमुखबद्दल जिनिलियाने केला सर्वात मोठा खुलासा!
अनन्या पांडेने हिप सर्जरी केली?; ‘त्या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
हवेलीत पार पडली ‘अजित मॅरेथॅान’, प्रतिक्षा बाजारे यांच्याकडून आयोजन






