“काम न करता निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आम्ही आडवे करू”; भाजप-शिंदे गटात गृहयुद्ध

On: October 15, 2025 7:23 PM
Maharashtra Election 2025
---Advertisement---

Kalyan Dombivli Elections। कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Elections) निवडणूक जवळ आल्यात आणि या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत वाद होताना दिसत आहे. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे (Arvind More) यांनी मोठे विधान केले आहे. कल्याण येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजपाला आव्हान दिले आहे. “काम न करता निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आम्ही आडवे करू.” असे विधान त्यांनी या कार्यक्रमात केले. (Kalyan Dombivli Elections)

भाजप-शिंदे गटात गृहयुद्ध! :

युती झाली तर ठीक नाही तर स्वबळावर लढू असे देखील ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकारणात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात त्यांनी शिवसैनिकांना प्रत्येक भागात निवडणुका लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन केले आहे.

हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. मोरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब (Nandu Parab) यांनी देखील मोरेंवर पलटवार केला. “मोरे यांनी आडवे पाडण्याची भाषा करू नये. मागील निवडणुकीत आमच्या सचिन खेमाणी यांनी त्यांना पराभूत केले होते. प्रसिद्धीसाठी ते काहीही बोलतात. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.” असे प्रत्युत्तर नंदू परब यांनी दिले आहे. तसेच युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची भाजपाची ताकद असल्याचा दावा परब यांनी केला आहे. (Kalyan Dombivli Elections)

Kalyan Dombivli Elections | सुज्ञ जनता या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवेल :

दरम्यान, मनसेच्या माजी नगरसेवकांनीही यावर टीका केली असून, “भाजप-शिवसेना युतीच्या चर्चने जनतेचे लक्ष विचलित करत आहेत.

गेल्या २५-३० वर्षांपासून केडीएमसीवर या पक्षांची सत्ता आहे, पण रस्त्यावरील खड्डे, धूळ आणि सर्पदंशासारख्या दुर्घटना कायम आहेत. सुज्ञ जनता या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवेल.”

Title – Civil War between BJP-Shinde Gut for Kalyan-Dombivli Elections

Join WhatsApp Group

Join Now