Crime News l राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अशातच आता कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सासऱ्याने थेट जावयावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या हल्ल्यात जावई अत्यंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं प्रकरण काय? :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, हनिमुनला जाण्यावरुन सासरा आणि जावई यांच्यात टोकाचा वाद झाला. मात्र त्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील ईबाद फालके असं जावयाचं नाव असून जकी खोटाल असे हल्लेखोर सासऱ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी सासऱ्याचा शोध पोलिस घेत आहे. तसेच यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जावई आणि मुलीने प्राथनेसाठी मक्का मदिनेला जावे, अशी सासरा जकी खोटाल यांची मागणी होती. मात्र, जावयाने आम्ही काश्मीरला जाणार असल्याचे सासऱ्यांना सांगितले होते. मात्र याप्रकरणावरून काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता.
Crime News l घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली :
दरम्यान, जावई आणि मुलगी हनिमुनला कुठे जाणार? या घटनेवरून दोघांमध्ये वाद असतानाच सासऱ्याने जावयावर अॅसिड हल्ला केला. मात्र यावेळी हनिमूनला नेमकं कुठे जायचे? यावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या हल्ल्यात जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
News Title – kalyan crime news Father in Law acid Attack on son in law
महत्त्वाच्या बातम्या-
… तर मग नव्या मंत्र्यांनी काय करायचं?; शिंदे गटाच्या आमदाराचा संतप्त सवाल
अमित शाहांच्या वक्तव्याने वाद, आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन
“वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये…”; आमदार क्षीरसागर कडाडले
मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी
31 ची पार्टी करा आलीशान क्रूझवर, IRCTC चे स्पेशल ‘क्रूझ टूर पॅकेज’कसं बुक कराल?






