मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट?, मोठा खुलासा समोर

On: December 21, 2024 10:02 AM
Kalyan Attack Marathi Family
---Advertisement---

Kalyan Attack Marathi Family | कल्याणच्या योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा सोसायटीत अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख नामक एका मराठी व्यक्तीला बेदम मारहाण केली. या हिंदी भाषिक अधिकाऱ्याने गुंड बोलवून मारहाण केली. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. इतकंच नाही तर या हिंदी भाषिक अधिकाऱ्याने मराठी भाषेबद्दल देखील अपशब्द वापरले आहेत. या प्रकरणानंतर मनसे देखील आक्रमक झाली. (Kalyan Attack Marathi Family)

मारहाण करणाऱ्या या अखिलेश शुक्लाला कालच अटक करण्यात आली. तसेच अखिलेश शुक्ला याची खाजगी गाडी देखील ताब्यात घेतली आहे. या गाडीला नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अशात ज्यांना मारहाण झाली त्या अभिजीत देशमुख यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. आरोपी अखिलेश शुक्लाकडे पिस्तुल होतं, असा धक्कादायक दावा त्यांनी केलाय.

अभिजीत देशमुख यांचा गंभीर दावा

इतकंच नाही तर, पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने अखिलेश शुक्लाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. आम्हाला सकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून घेतलं तरीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप अभिजीत देशमुख यांनी केला आहे. दरम्यान,  कोणताही अधिकार नसताना गाडीवर अंबरदिवा वापरल्यामुळे अखिलेश शुक्लाची गाडी देखील ताब्यात घेण्यात आलीये.

तसेच या गाडीचा इन्शुरन्स आणि पीयूसी संपला असताना देखील त्याने गेली चार वर्ष या गाडीचा वापर केला. अधिकार नसतानाही बेकायदेशीर रित्या या गाडीमध्ये अंबर दिवा लावल्याप्रकरणी अखिलेश शुक्लावर कारवाई करण्यात आलीये. या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. (Kalyan Attack Marathi Family)

अखिलेश शुक्लासह दोघांना अटक

मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येत असते आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणात गंभीर जखमी झालेले अभिजित देशमुख यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील दिसून आले.मनसे, शिवसेना ठाकरे गटानेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.या प्रकरणी अखिलेश शुक्लासह आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय. (Kalyan Attack Marathi Family)

News Title –  Kalyan Attack Marathi Family VIP treatment to Akhilesh Shukla

महत्त्वाच्या बातम्या-

बीडचं राजकारण तापणार?, शरद पवार आज मस्साजोग दौऱ्यावर

“माझ्या बाबांना ज्या प्रकारे मारलं, तशीच शिक्षा…”; संतोष देशमुखांच्या मुलीचा टाहो

इंधनदरात दिलासा! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर

मेष ते मीन आज शनिदेव कोणत्या राशींवर ठेवणार कृपादृष्टी?, वाचा राशीभविष्य

सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया!

Join WhatsApp Group

Join Now