मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी महत्त्वाची व्यक्ती जेरबंद!

On: December 21, 2024 12:38 PM
Kalyan Attack Marathi Family
---Advertisement---

Kalyan Attack Marathi Family | कल्याणच्या योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा सोसायटीत अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख या मराठी व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना राज्यात घडली आहे. मात्र आता या घटनेचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटत आहेत. अशातच आता या घटनेप्रकरणी एक मोठी अपडेट्स समोर आली आहे.

पोलिसांनी उचललं मोठं पाऊल :

कल्याणच्या योगीधाम अजमेरा सोसायटीत मराठी कुटुंबाला मारहाण केल्याने राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. मात्र आता या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत देखील उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी काल आरोपी अखिलेश शुक्लाला अटक देखील केली आहे.

मात्र आता या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक केल्यानंतर आज त्याची पत्नी गीता शुक्लाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय या प्रकरणातील अन्य दोन जणांचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच अखिलेश शुक्लाच्या पत्नीची देखील कसून चौकशी केली जात आहे.

Kalyan Attack Marathi Family | आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार :

मराठी कुटुंबाला मारहाण केलेल्या या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह सुमित जादव आणि दर्शन बोराडे या दोघांना अटक केली होती. मात्र मारहाण प्रकरणानंतर अखिलेश शुक्ला हा टिटवाळ्यात लपून बसला होता, मात्र त्या ठिकाणावरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मात्र आज अखिलेश शुक्लाची पत्नी गीता शुक्लासह अन्य दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांनी एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणातील चार आरोपींचा शोध सुरू आहे. याशिवाय आज दुपारच्या सुमारास या सर्व आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार असून या प्रकरणातील आरोपींना एमसीआर की पीसी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title –  Kalyan Attack Marathi Family News

महत्त्वाच्या बातम्या-

“वाल्मिक कराड कुठं आहेत? पत्ता देतो…”; धनंजय मुंडे काय म्हणाले?

लाडक्या बहीणींची संक्रांत होणार गोड, 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?

मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी महत्त्वाची व्यक्ती जेरबंद!

धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं; ‘या’ कारणामुळे मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?

ग्राहकांसाठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, किती रुपयांनी घसरले भाव?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now