‘विमान क्रॅश झाल्याने काजोलचा मृत्यू?’; निधनाच्या बातमीने उडालेली खळबळ

On: October 27, 2024 7:09 PM
kajol
---Advertisement---

Kajol | बाॅलिवूड अभिनेत्री काजोलने आपल्या उत्तम अभिनयाने आणि मनमोकळ्या स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. आज देखील काजोलचे चित्रपट लोक आवडीने पाहतात. सोशल मीडियावर काजोलची जबरदस्त फॅन फाॅलोईंग आहे. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ काजोल चाहत्यांसाठी शेअर करत असते. दरम्यान, काजोल, (Kajol) क्रिती सनॉन आणि अभिनेता शहीर शेख यांचा ‘दो पत्ती’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा किस्सा काजोलने शेअर केला ज्याची सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाली काजोल?

‘दो पत्ती’ या सिनामाच्या कलाकारांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये हजेरी लावली. या वेळेस काजोलने (Kajol) स्वतःच्या निधनाच्या पसरलेल्या अफवांबद्दल खुलासा केला. कपील शर्माने उपस्थित कलाकरांना स्वतःबद्दल कधी फेक बातम्या वाचल्या का? असा प्रश्न केला. यावर काजोल म्हणाली की, अशा विचित्र बातम्यांबद्दल गुगल देखील करायची गरज भासत नाही. कारण काहीही झालं तरी लगेच फोन येतात.’ कपीलने विचारलं की अशी कोणती बातमी तुला अधिक विचित्र वाटली? यावर काजोल (Kajol) म्हणाली, दर 5 ते 10 वर्षांनी अफवा रंगते की माझं निधन झालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ELLE India (@elleindia)

विमान क्रॅश झाला-

पुढे काजोल (Kajol) म्हणाली की, कोणी तरी माझ्या आईला माझं निधन झाल्याची माहिती दिली होती. तेव्हा फोन आणि सोशल मीडिया असं काहीही नव्हतं. तेव्हा माझी आई माझी वाट पाहत बसली होती. तेव्हा माझा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं, ती माझ्यासाठी सर्वात विचित्र बातमी होती.

News Title : kajol airoplane gets crashed

महत्त्वाच्या बातम्या-

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका!

‘या’ प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा मित्रासोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल!

शरद पवार गटाची अंतिम यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरुद्ध ‘हा’ नेता लढणार

‘…तर तुम्हाला एवढं झोंबलं का?’; राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले

अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; लंकेंविरोधातला उमेदवार ठरला

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now