फडणवीसांनी एका दगडात मारले 5 पक्षी?; बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित

On: November 1, 2025 3:31 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्जमाफीसाठी ३० जूनपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपले नागपूरमधील (Nagpur) आंदोलन स्थगित केले. मात्र, या आश्वासनामुळे आणि स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीमुळे सरकारवरच टीका होत असून, शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आणि आंदोलनाची समाप्ती :

प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये (Nagpur) आंदोलन सुरू केले होते. पावसामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकरी नेत्यांशी सकारात्मक चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी एक उच्चस्तरीय समिती (High-Level Committee) स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती १ एप्रिलपर्यंत आपला अहवाल सरकारला सादर करेल.

या अहवालानंतर, ३० जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या चर्चेनंतर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, “जर दगाफटका झाला, तर फासावर जाऊ, हे आंदोलन संपलेले नाही,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यापूर्वी मार्चमध्ये रायगड (Raigad) आणि जूनमध्ये अमरावतीतही (Amravati) आंदोलन केले होते.

Devendra Fadnavis | डेडलाईनवर टीका आणि राजकीय डावपेच : 

सरकारच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कर्ज भरावे लागते, तरच जूनमधील पेरणीसाठी नवीन कर्ज मिळते. सरकार ३० जूनला निर्णय घेणार असेल, तर शेतकरी पेरणी कशी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. हा ८ महिन्यांचा कालावधी देऊन सरकारने आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील विरोधकांची कोंडी केल्याची चर्चा आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूरला (Nagpur) गेलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मात्र या निर्णयावर तीव्र हल्लाबोल केला. “ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. ३० जूनपर्यंत शेतकरी मरेल. हे सरकार मोगलांपेक्षा क्रूर आहे आणि सूड भावनेने वागत आहे,” असा आरोप त्यांनी केला. समिती बरखास्त करून सरसकट कर्जमुक्ती द्या, नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही जरांगे (Jarange) यांनी दिला.

News title : Kadu Pauses Protest; Govt Sets Deadline

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now